घरCORONA UPDATEVideo: 'मी जिवंत आहे'; डॉक्टरांनी जिवंत रुग्णाला केलं मृत घोषित

Video: ‘मी जिवंत आहे’; डॉक्टरांनी जिवंत रुग्णाला केलं मृत घोषित

Subscribe

मध्य प्रदेशमधील उज्जैनमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे.

संपूर्ण जगाला हतबल करुन सोडणाऱ्या कोरोना विषाणूवर अद्याप लस सापडलेली नाही. रुग्णाला त्या-त्या लक्षणांवरुन औषध दिलं जात आहे. कोरोनाच्या संकटात डॉक्टरांचा निष्काळजीपणा रुग्णांना महाग पडू शकतो. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मध्य प्रदेशमधील डॉक्टरांकडून एक मोठी चूक झाली आहे. मध्य प्रदेशच्या आरोग्य विभागाने जिवंत असलेल्या कोरोनाच्या रुग्णाला मृत घोषित करुन त्याबाबतची माहिती वृत्तपत्रात दिली. हि गोष्ट जेव्हा त्या रुग्णाला समजली, तेव्हा त्याने “मी जिवंत आहे,” असा व्हिडिओ शेअर केला. मध्य प्रदेशमधील उज्जैनमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे.

मध्य प्रदेशमधील डॉक्टरांकडून एक मोठी चूक झाली. डॉक्टरांनी जिवंत असलेल्या कोरोना रुग्णाला मृत घोषित करत वृत्तपत्रात माहिती दिली. रुग्णाने वर्तमानपत्रात आपल्या मृत्यूची बातमी वाचली आणि त्याला धक्काच बसला. त्याने आपण जिवंत असल्याचा एक व्हिडीओ तयार करत सोशल मीडियावर शेअर केला. आरोग्य विभागाने हा व्हिडीओ पाहिल्यानंतर संबंधित डॉक्टरांवर कारवाई केली आहे.

- Advertisement -

“मला दोन दिवसांपूर्वी आरडी गर्दी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मी एका वृत्तपत्रात वाचलं की माझा मृत्यू झाला आहे. पण मी जिवंत आणि निरोगी आहे. कृपया हा व्हिडीओ इतरांसोबत शेअर करावा,” असं रुग्णाने आपल्या व्हिडीओमध्ये म्हटलं आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Coronavirus: भारतात १७ हुन अधिक देशांतून कोरोनाचा शिरकाव


दरम्यान, काही दिवसांपूर्वीही अशीच एक घटना समोर आली होती. तामिळनाडूमधील विल्लूपूरमच्या रुग्णालयातील डॉक्टरांनी चार कोरोनाबाधितांचा रिपोर्ट चुकून निगेटिव्ह समजून त्यांना डिस्चार्ज दिलं होतं. मात्र त्यानंतर त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह असल्याची माहिती समोर आल्याने खळबळ माजली होती.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -