घरदेश-विदेशइलेक्ट्रिक अवतारात अँबेसेडर परतणार, कधी काळी होती पंतप्रधानांची सवारी

इलेक्ट्रिक अवतारात अँबेसेडर परतणार, कधी काळी होती पंतप्रधानांची सवारी

Subscribe

वाहन क्षेत्र सध्या क्रांतीच्या मार्गावर आहे. ज्यात अनेक कार उत्पादक प्रमुख कंपन्या इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये प्रवेश करण्याची योजना बनवत आहेत. इलेक्ट्रिक वाहन उद्योग आता एक प्रारंभिक टप्पा आहे, अँबेसेडर निर्माती हिंदुस्तान मोटर्स इलेक्ट्रिक वाहनांसह बाजारात परतण्याच्या विचारात आहे.

नवी दिल्लीः अँबेसेडर गाडी कोणाला माहीत नसेल, एक वेळ अशी होती की, पंतप्रधानांपासून ते मुख्यमंत्री, डीएम, एसडीएससुद्धा या गाडीतून प्रवास करायचे, 2014 ला याचं प्रोडक्शन बंद झालं. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अँबेसेडर तयार करणारी कंपनी हिंदुस्तान मोटर्स कथित स्वरूपात इलेक्ट्रिक वाहन प्रकारात पुन्हा बाजारात प्रवेश मिळवण्याची योजना आखत आहे.

वाहन क्षेत्र सध्या क्रांतीच्या मार्गावर आहे. ज्यात अनेक कार उत्पादक प्रमुख कंपन्या इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये प्रवेश करण्याची योजना बनवत आहेत. इलेक्ट्रिक वाहन उद्योग आता एक प्रारंभिक टप्पा आहे, अँबेसेडर निर्माती हिंदुस्तान मोटर्स इलेक्ट्रिक वाहनांसह बाजारात परतण्याच्या विचारात आहे.

- Advertisement -

मीडिया रिपोर्टनुसार, हिंदुस्थान मोटर्स, भारतातील पहिली कार निर्माता कंपनी EV उद्योगातील युरोपियन ऑटो प्रमुख कंपनीसोबत संयुक्त उपक्रम (JV) मध्ये प्रवेश करून आपला व्यवसाय पुनरुज्जीवित करण्याचा विचार करत आहे. हिंदुस्थान मोटर्सने युरोपियन ईव्ही उत्पादक कंपनीसोबत सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे. प्रतिष्ठित अॅम्बेसेडर कारची निर्मिती हिंदुस्तान मोटर्सने केली होती, ज्यांनी 1958 मध्ये उत्पादन सुरू केले होते आणि जवळपास 50 वर्षांनंतर 2014 मध्ये ते बंद करण्यात आले होते.

दोन्ही उत्पादक कंपन्या सध्या कारच्या रचनेवर चर्चा करीत आहेत. सध्याच्या प्रस्तावित फ्रेमवर्कमध्ये हिंदुस्तान मोटर्सकडे 51% आणि युरोपियन ब्रँडचा उर्वरित 49% हिस्सा असेल. केवळ इलेक्ट्रिक कारच नाही तर दोन्ही संयुक्त उपक्रमांचा फोकस इलेक्ट्रिक दुचाकींवर आहे. कंपनीचे पहिले उत्पादन इलेक्ट्रिक स्कूटर असेल. इलेक्ट्रिक स्कूटर किंवा बाईकला खरेदीदारांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांची विक्री सातत्याने वाढत आहे.

- Advertisement -

1960 ते 1990 च्या दशकाच्या मध्यापर्यंत अॅम्बेसेडर हे भारतातील एक स्टेटस सिम्बॉल होते आणि बाजारात मोठ्या प्रमाणात उत्पादित केलेली लक्झरी कार होती. जेव्हा कंपनीने 2013-14 मध्ये वाहनाचे उत्पादन थांबवले तेव्हा वार्षिक विक्री 1980 च्या मध्यात 20,000 युनिट्सवरून 2,000 युनिट्सपेक्षा कमी झाली.


हेही वाचाः येत्या ४८ तासांत केरळमध्ये होणार मान्सूनचे आगमन; हवामान विभागाचा अंदाज

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -