घरदेश-विदेशजोशीमठात लष्कराच्या बरॅकानाही हादरे, जवानांना दुसरीकडे हलवले

जोशीमठात लष्कराच्या बरॅकानाही हादरे, जवानांना दुसरीकडे हलवले

Subscribe

Joshimath News | सेनेचे बिग्रेड मुख्यालय अत्यंत सुरक्षित आहे. मुख्यालय पर्वतांवर आहे. भारत-तिबेट सीमा पोलिसांचे बटालियनही सुरक्षित आहेत. जोशीमठाच्या खालच्या भागावर अधिक हादरे बसले आहेत.

Joshimath News | नवी दिल्ली – उत्तराखंडच्या जोशीमठमध्ये लष्कराच्या काही बरॅकांनाही हादरे बसले आहे. त्यामुळे लष्कराचा बरॅक दुसरीकडे हलवण्यात आले आहे. नदीकिनारी असलेल्या बरॅकांना हादरे बसले आहेत. तर, सेनेचे बिग्रेड मुख्यालय अत्यंत सुरक्षित आहे. मुख्यालय पर्वतांवर आहे. भारत-तिबेट सीमा पोलिसांचे बटालियनही सुरक्षित आहेत. जोशीमठाच्या खालच्या भागावर अधिक हादरे बसले आहेत.

जोशीमठात सातत्याने भूस्खलन होत असल्याने या प्रदेशाला Sinking Zone म्हणून घोषित करण्यात आले आहे. उत्तराखंड येथील बद्रीनाथपासून अवघ्या ५० किमी अंतरावर जोशीमठ शहर आहे. येथील घरांना व भिंतींना मोठ्या प्रमाणात तडे गेले आहेत. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. स्थानिक नागरिक येथून स्थलांतरीत होत आहेत. येथे उद्भवलेल्या परिस्थितीचा मुख्यमंत्री पुष्कर धामी यांनी शुक्रवारी आढावा घेतला.जोशीमठातील नागरिकांना सहा महिने घरभाडे देण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. ज्या नागरिकांची घरे धोकादायक आहेत किंवा राहण्याजोगी नाहीत. अशा नागरिकांना सहा महिन्याचे घरभाडे देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अशा नागरिकांना प्रति महिना चार हजार रुपये घरभाडे दिले जाणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा – जोशीमठ प्रकरणात तात्काळ सुनावणी घेण्यास SCचा नकार; म्हणाले…

जोशीमठ परिसरातील धोकादायक जागांचा आढावा घेण्यात येत आहेत. आतापर्यंतच्या पाहाणीत येथील ५०० हून अधिक घरांना तडे गेल्याची माहिती आहे. राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक व स्थानिक आपत्ती निवारण पथक परिस्थितीचा आढावा घेत आहे. येथील विविध प्रशासकीय कामेही तत्काळ थांबवण्यात आली आहेत. पुढील आदेश येईपर्यंत प्रशासकीय कामांना स्थगिती राहणार आहे. नागरिकांनी घाबरु नये, अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन स्थानिक प्रशासनाने केले आहे.

- Advertisement -

प्रत्येक प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आणण्याची गरज नाही : SC
सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड आणि न्यायमूर्ती पी. एस. नरसिम्हा यांच्या खंडपीठाने एक निरीक्षण नोंदवले आहे. सर्व महत्त्वाच्या गोष्टी सर्वोच्च न्यायालयासमोर येण्याची गरज नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. ते पाहण्यासाठी लोकशाही पद्धतीने निवडलेल्या संस्था आहेत.

असुरक्षित हॉटेल आणि घरे पाडली जात आहेत
जोशीमठमध्ये दरड कोसळल्याने दोन हॉटेल्स आणि अनेक घरांवर मार्किंग करून बंदी घालण्यात आली होती. ही बंदी असलेली घरे आणि हॉटेल्स पाडण्याची कारवाई प्रशासनाकडून करण्यात येत आहे. हॉटेल मलारी इन आणि माऊंट व्ह्यू जेसीबीनं पाडून टाकण्यात येत आहेत. त्याची जबाबदारी सेंट्रल बिल्डिंग रिसर्च इन्स्टिट्यूट (CBRI), नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनिअरिंग (NIM), स्टेट डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स (SDRF) आणि सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) यांना देण्यात आली आहे.

हेही वाचा जोशीमठातील सुमारे ५०० घरांना तडे; प्रशासन अलर्ट मोडवर

भूस्खलनामुळे झुकलेल्या हॉटेल आणि इमारती
जोशीमठच्या सिंहधर वॉर्डात असलेल्या हॉटेल मलारी इन आणि माउंट व्ह्यूच्या इमारती एकमेकांवर झुकल्या आहेत. डिसेंबरपासूनच या हॉटेल्समध्ये तडे जाण्यास सुरुवात झाली आहे. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात हॉटेल बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -