घरCORONA UPDATECoronaEffect: चीनमधील कच्चा मालाची आवक थांबली; भारत चिंतेत

CoronaEffect: चीनमधील कच्चा मालाची आवक थांबली; भारत चिंतेत

Subscribe

चीनमधून माल आयात करण्यावर असलेले निर्बंध आणि लॉकडाऊन यामुळे हायड्रोक्सीक्लोरोक्वीनचे उत्पादन कसे करायचे, असा प्रश्न देशातील औषध कंपन्यांसमोर निर्माण झाला आहे.

जगभरात धुमाकूळ घातलेल्या कोरोनावर हायड्रोक्सीक्लोरोक्वीनची मात्रा काही प्रमाणात चालत असल्याने अमेरिकेने या औषधांची केलेली मागणी भारताने मान्य केली असली तरी या औषधांचे भारतातील उत्पादनच सध्या संकटात सापडले आहे. हायड्रोक्सीक्लोरोक्वीनच्या उत्पादनासाठी आवश्यक असलेला कच्चा माल चीनमधून आयात करावा लागतो. परंतु चीनमधून माल आयात करण्यावर असलेले निर्बंध आणि लॉकडाऊन यामुळे हायड्रोक्सीक्लोरोक्वीनचे उत्पादन कसे करायचे, असा प्रश्न देशातील औषध कंपन्यांसमोर निर्माण झाला आहे.

मलेरियाच्या तापासाठी उपयुक्त असलेल्या हायड्रोक्सीक्लोरोक्वीन या औषधाची सर्वाधिक निर्मितीबरोबरच ते निर्यात करण्यामध्ये भारताचा अव्वल क्रमांक आहे. मलेरियाचे सर्वाधिक रुग्ण असलेल्या दक्षिण आफ्रिकेमध्ये या औषधाची निर्यात केली जाते. परंतु हे औषधं कोरोनासारख्या जागतिक महामारीवर दिलासादायक ठरत असल्याने अमेरिकेने या औषधाची मागणी भारताकडे केली. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी औषधं देण्यास नकार दिल्यानंतर ट्रम्प यांना धमकीच्या भाषेचा वापर करावा लागला होता. अखेर अमेरिकेतील बिघडत असलेली परिस्थिती लक्षात घेऊन मोदींनी अमेरिकेला हायड्रोक्सीक्लोरोक्वीनचा पुरवठा करण्यास मान्यता दिली. परंतु सध्या भारतामधीलच हायड्रोक्सीक्लोरोक्वीनचे उत्पादनच संकटात सापडले आहे.

- Advertisement -

कोणतेही औषध बनवण्यासाठी अॅक्टिव्ह फर्मास्युटिकल इंग्रेडियन्ट (एपीआय) म्हणजे कच्चा मालाची गरज लागते. भारतामध्ये हायड्रोक्सीक्लोरोक्वीनसाठी लागणारे एपीआय बनवणाऱ्या ५ ते ६ कंपन्यांचे आहेत. तसेच हा एपीआय बनवण्यासाठी आवश्यक असणारे घटक म्हणजे इंटरमीडियेट हे चीनमधून आयात करावे लागतात. इंटरमीडियेट हे चीनमध्ये स्वस्त मिळत असल्याने देशातील औषध कंपन्या याची निर्मिती करण्याऐवजी ते चीनमधून आयात करण्याला प्राधान्य देतात. परंतु कोरोनाचा प्रसारच चीनमधून झाल्याने त्यांच्याकडून वस्तू मागवण्यात येत नाही. त्यामुळे हायड्रोक्सीक्लोरोक्वीनच्या कच्चा मालासाठी आवश्यक असलेले इंटरमीडियेटच सध्या पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत नाही. त्यातच देशात असलेल्या लॉकडाऊनमुळे मनुष्यबळ उपलब्ध होत नसल्याने देशातील औषध कंपन्यांचे उत्पादन ठप्प झाले. इंटरमीडियेटचा अभाव आणि लॉकडाऊन यामुळे देशातील १३० कोटी नागरिकांना मिळेल इतके हायड्रोक्सीक्लोरोक्वीनची निर्मिती कशी करायची, असा प्रश्न औषध निर्मिती करणाऱ्या कंपन्यांसमोर निर्माण झाला आहे.

लक्षणानुसार दिलासादायक

मलेरियाच्या तापादरम्यान यकृताला सूज येते, तसेच व्यक्तीची रोगप्रतिकारकशक्ती कमी होते. त्यामुळे मलेरियाच्या रुग्णाला हायड्रोक्सीक्लोरोक्वीन हे औषध दिले जाते. परंतु कोरोनाच्या रुग्णांनाही सुरुवातीच्या लक्षणानुसार हायड्रोक्सीक्लोरोक्वीन दिल्यावर त्यांना दिलासा मिळत असल्याचे समोर आल्याची माहिती आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिली.

- Advertisement -

हेही वाचा –

Coronavirus : धारावीत आणखी एका बळी, आतापर्यंत ४ जणांचा मृत्यू

Vinayak Dige
Vinayak Digehttps://www.mymahanagar.com/author/dvinayak/
१२ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. आरोग्य, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -