घरदेश-विदेशबँकेत खाते उघडायला गेला आणि नीरव मोदी फसला

बँकेत खाते उघडायला गेला आणि नीरव मोदी फसला

Subscribe

पंजाब नॅशनल बँकेला (पीएनबी) गंडा घालून परदेशात पळलेल्या नीरव मोदीच्या अटकेला एक बँकच जबाबदार ठरली. पीएनबीचा लुटलेला पैसा लंडनमधील बँकेत खाते उघडून त्यात जमा करायला निघालेल्या नीरवला तेथेच अटक करण्यात आली. लंडनमधील मेट्रो बँकेच्या एका शाखेत नीरव मोदी खाते उघडायला गेला होता. त्यावेळी बँकेच्या एका क्लार्कने त्याला ओळखले. त्याने त्वरीत पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलीस बँकेत गेले आणि त्यांनी तेथेच नीरव मोदीच्या हातात बेड्या ठोकल्या.

हिरे व्यापारी नीरव मोदी याने पीएनबी बँकेच्या कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केला. आपली चोरी उघडकीस येणार हे कळल्यावर तो भारतातून पळून गेला. त्याविरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली. हा नीरव मोदी देशाबाहेर गेल्यानंतर थेट लंडनला पोहचला. तेथे तो उजळ माथ्याने वावरू लागला. आता भारत सरकार आपल्याला काहीच करू शकणार नाही, अशा भ्रमात नीरव मोदी होता. मात्र सीबीआयने त्याला पकडण्यासाठी सर्वप्रकारचे प्रयत्न सुरू केले होते.

- Advertisement -

लंडनच्या कोर्टात सीबीआयने अर्ज करून नीरव मोदीला अटक करण्याची विनंती केली होती. त्यानंतर लंडनच्या वेस्टमिन्स्टर कोर्टाने नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी केले होते. मात्र नीरव लंडनमध्येच फरार होता. आपल्याला अटक होणार हे निश्चित नीरवला कळल्यानंतर तो लंडनमधील मेट्रो बँकेत खाते उघडून चोरी केलेली रक्कम जमा करण्यासाठी गेला होता. मात्र तेथील क्लार्कने नीरव मोदीला ओळखले आणि पोलिसांना फोन केला. पोलीस त्वरीत बँकेत आले आणि त्यांनी नीरव मोदीला अटक केली.नीरव मोदीला अटक करून त्याला कोर्टात हजर करण्यात आले. त्यावेळी त्याच्या वकिलाने जामीनासाठी अर्ज केला होता. मात्र त्याचा जामीन अर्ज फेटाळला असून, २९ मार्चपर्यंत त्याला कोठडी सुनावण्यात आली आहे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -