घरदेश-विदेशभगवद्गीता घृणास्पद पवित्र ग्रंथांपैकी एक; युरोपीयन फिलॉसॉफरचे वादग्रस्त वक्तव्य

भगवद्गीता घृणास्पद पवित्र ग्रंथांपैकी एक; युरोपीयन फिलॉसॉफरचे वादग्रस्त वक्तव्य

Subscribe

हा व्हिडिओ @YearOfTheKraken ने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर शेअर केला आहे. यामध्ये झिझेक भगवद्गीतेच्या विरोधात बोलताना ऐकायला मिळतात. तो गीताला 'सर्वात अश्लील आणि घृणास्पद पवित्र ग्रंथांपैकी एक म्हणत आहे.

Controversial Statement on Bhagwat Geeta : प्रसिद्ध स्लोव्हेनियन तत्त्वज्ञ स्लावोज झिझेक यांनी भगवत गीतेबाबत वादग्रस्त विधान केले आहे. याबाबत आता सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे. त्यांच्या विधानामुळे आता गीता या पवित्र ग्रंथाबाबत आता समज- गैरसमज निर्माण होत आहेत. (The Bhagavad Gita is most obscene and disgusting holy texts European Philosopher Famous Slovenian Slavoj Žižek Controversial Statement)

हा व्हिडिओ @YearOfTheKraken ने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर शेअर केला आहे. यामध्ये झिझेक भगवद्गीतेच्या विरोधात बोलताना ऐकायला मिळतात. तो गीताला ‘सर्वात अश्लील आणि घृणास्पद पवित्र ग्रंथांपैकी एक म्हणत आहे. जर्मनीचे नाझी पक्षाचा कुप्रसिद्ध हेनरिक हिमलर याने भगवद्गीतेचा उपयोग ज्यूंचं नरसंहाराला न्याय देण्यासाठी केला होता, असा दावा त्यांनी केला.

- Advertisement -

भगवद्गीता 700 श्लोकांसह एक हिंदू धर्मग्रंथ

भगवद्गीता हा 700 श्लोकांचा समावेश असलेला हिंदू धर्मग्रंथ आहे. भगवद्गीता आध्यात्मिक शिकवणींसाठी आदरणीय आहे. अर्जुन आणि भगवान श्रीकृष्ण यांच्यातील संवादावर आधारित आहे. महाभारतात भगवान श्रीकृष्ण अर्जुनाचे सारथी होते. त्यांनी अर्जुनाला कर्तव्य, धर्म आणि जीवनाचे स्वरूप याविषयी मार्गदर्शन केले. या धर्मग्रथांत कर्तव्य (धर्म), नैतिक दुविधा आणि आध्यात्मिक प्राप्तीबाबत सांगण्यात आलं आहे.

झिझेकचा दावा – हेनरिक हिमलरने भगवद्गीता जवळ ठेवली

भगवद्गीतेवर टीका करताना झिझेकने नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘ओपेनहायमर’ या हॉलिवूड चित्रपटातील एका दृश्याचाही उल्लेख केला. या चित्रपटातील इंटिमेट दृश्यात बाजूला भगवद्गीता दाखवली आहे. झिझेक पुढे म्हणाले, “तुम्हाला आठवत असेल की चित्रपट ओपेनहायमरमुळे भारतात वाद झाला होता. झिझेक पुढे म्हणाले की, घाणेरडी अश्लील कृती करताना बाजूला भगवद्गीता दाखवल्यामुळे भारतीयांनी नाराजी व्यक्त केली होती. मी त्यांच्याशी सहमत आहे, मात्र अगदी उलट अर्थाने. प्रेमसंबंधांसारखी सुंदर कृती करतानाचा क्षण ते मध्येच हे घाणेरडं पवित्र पुस्तक वाया घालवतात, अशी गरळ झिझेक यांनी ओकली आहे.

- Advertisement -

झिझेकने दावा केला की नाझी अधिकारी हेनरिक हिमलर नेहमी सोबत भगवद्गीता ठेवायचा. कारण ज्यूंना कसे मारायचे याचे उत्तर तो त्यात शोधायचा. जेव्हा हिमलर यांना विचारलं जात की आपण अगदी भयानक कृत्य करत आहोत, आपण मिहलांना आणि लहान मुलांना मारत आहोत. आपण मानवी असून असं कसं करू शकतो? त्यावर त्याचं उत्तर एकच होतं-भगवद्गीता.

(हेही वाचा: Gurugram : दिल्ली-जयपूर महामार्गावर खासगी बसला भीषण आग; अपघातात दोघांचा मृत्यू, 12 गंभीर )

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -