घरदेश-विदेशBJP मुळे ईशान्यकडील राज्य युद्धाचे रणांगण बनले; काँग्रेसचा हल्लाबोल

BJP मुळे ईशान्यकडील राज्य युद्धाचे रणांगण बनले; काँग्रेसचा हल्लाबोल

Subscribe

इंफाळच्या सिंगजामेई भागात 6 जुलैपासून बेपत्ता झालेल्या दोन विद्यार्थ्यांच्या हत्येच्या निषेधार्थ आरएएफ जवान आणि स्थानिक लोकांमध्ये मंगळवारी रात्री चकमक झाल्यानंतर काँग्रेस अध्यक्षांनी हे वक्तव्य केले.

नवी दिल्ली : संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेणाऱ्या मणिपूर हिंसाचारावरून कॉंग्रेसने पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी बुधवारी मणिपूरमधील परिस्थितीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आणि भाजपच्या मुख्यमंत्र्यांना असमर्थ ठरवून त्यांना बडतर्फ करण्याची मागणी केली. (The BJP made the northeastern state a battleground Congress slogan)
कॉंग्रेसचे अध्यक्ष खर्गे यांनी ट्विटरवरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, भाजपमुळे ईशान्येकडील राज्य सध्या युद्धांचे रणांगण झाले आहेत. तर महिला आणि मुलांना हिंसेसाठी हत्यार म्हणून वापर केल्या जात असल्याचेही त्यांनी ट्वीट म्हटले आहे.

इंफाळच्या सिंगजामेई भागात 6 जुलैपासून बेपत्ता झालेल्या दोन विद्यार्थ्यांच्या हत्येच्या निषेधार्थ आरएएफ जवान आणि स्थानिक लोकांमध्ये मंगळवारी रात्री चकमक झाल्यानंतर काँग्रेस अध्यक्षांनी हे वक्तव्य केले. चकमकीदरम्यान, सुरक्षा कर्मचार्‍यांनी आंदोलकांवर अश्रुधुराच्या गोळ्या, रबराच्या गोळ्या आणि लाठीचार्ज केला, यात 45 आंदोलक जखमी झाले, त्यापैकी बहुतेक विद्यार्थी होते.

- Advertisement -

मणिपूरसाठी मोदींकडे वेळच नाही

मणिपूरमध्ये झालेल्या हिंसेवरून कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्ला केला. त्यामध्ये ते म्हणाले की, मणिपूरचे लोक 147 दिवसांपासून त्रस्त आहेत, पण पंतप्रधान नरेंद्र मोदींना राज्याचा दौरा करायला वेळ नाही. या हिंसाचारात विद्यार्थ्यांना लक्ष्य करण्यात आल्याच्या भीषण चित्रांनी पुन्हा एकदा संपूर्ण देश हादरला आहे. तेव्हा याकडे पंतप्रधानांनी लक्ष द्यावे अशीही मागणी खर्गे यांनी ट्वीटच्या माध्यमातून केली आहे.

हेही वाचा : संकटातील बहिणीसाठी भाऊ आला धावून, पंकजा मुंडेंचा साखर कारखाना चालवण्यासाठी धनंजय मुंडे करणार ‘हे’ काम?

- Advertisement -

दोषींवर कारवाई करण्याची मागणी

काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांनीही मणिपूरमध्ये दोन तरुणांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला आहे. आरोपींना लवकरात लवकर अटक व्हावी, अशी आमची मागणी आहे, असे ते म्हणाले. सरकारने त्यांच्यावर कडक कारवाई करावी सध्या त्यासाठी सध्या विद्यार्थी रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. काँग्रेस पक्ष मणिपूरच्या विद्यार्थ्यांच्या वेदना आणि संताप जाणतो म्हणून आम्ही त्यांच्यासोबत आहोत.

हेही वाचा : अल्पवयीन मुलीसोबत सैन्यअधिकाऱ्याची पत्नी करत होती असे काही की तुम्ही पण म्हणाल…

मणिपूरमध्ये यामुळे भडकली हिंसा

3 मे रोजी बहुसंख्य मेतेई समुदायाला अनुसूचित जमातीचा दर्जा मिळावा या मागणीला विरोध करण्यासाठी डोंगराळ जिल्ह्यांमध्ये ‘आदिवासी एकता मार्च’ काढण्यात आला तेव्हा वांशिक संघर्ष सुरू झाल्यापासून मणिपूर तणावाखाली आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -