नवी दिल्ली : चांद्रयान-3 मोहीमेच्या यशस्वीतेनंतर अनेकांना आता चंद्राबद्दल आकर्षण वाढले आहे. दरम्यान आता याच चंद्राचे निळे स्वरुप म्हणजेच ब्लू सुपर मूनचे दर्शन होणार आहे. 30 ऑगस्ट रोजी अवकाशात निळ्या स्वरुपाचा चंद्र दिसणार असून, या वर्षातील तिसऱ्यांदा सर्वात मोठा चंद्र दिसणार असल्याने खगोलप्रेमींसाठी चंद्र पाहण्याची ही सर्वात मोठी संधी असणार आहे.(The blue form of the moon that will be seen tomorrow, the Big Moon will be visible to the astro-enthusiasts)
30 ऑगस्ट रोजी चंद्र त्याच्या एकुण आकाराच्या तुलनेत तब्बल सातपट जास्त मोठा आणि 16 पट अधिक प्रकाशित स्वरुपाचा दिसणार आहे. उद्या होणाऱ्या या खगोलीय घटनेचे साक्षिदार बनण्यासाठी अनेकजण तयार असून, कारण, यानंतर पुन्हा कधी अशी खगोलीय घटना पाहायला मिळेल सांगता येत नाही.
दोन ते तीन वर्षानंतर घडतायेत अशा घटना
ब्लू सूपरमून म्हणजेच निळा चंद्र आणि त्याचे एवढे मोठे स्वरुप दिसण्याची ही घटना अवकाशात दोन ते तीन वर्षातून एकदा घडत असते. आता यानंतर 2026 मध्ये अशी घटना घडणार आहे. याआधी 2018 मधअये ब्लू सुपरमून घटनेवेळी चंद्र हा पृथ्वीच्या 3 लाख 57 हजार 530 किलो मीटर अंतरावर होता. तर आता उद्या 30 ऑगस्ट रोजी चंद्र हा पृथ्वीपासून 3 लाख 57 हजार 344 किलो मीटर अंतरावर असणार आहे. या घटनेबाबत तुम्हाला असे वाटत असेल की, तुम्हाला उद्या चंद्र निळ्या स्वरुपाचा दिसणार आहे. तर तसे नाही कारण, चंद्र हा उद्या केशरी रंगाचा दिसणार आहे. तर चला मग समजून घेऊ या की काय असते ब्लू सुपरमून?.
हेही वाचा : Pakistan : इम्रान खान यांना दिलासा, हायकोर्टाकडून तीन वर्षांच्या शिक्षेला स्थगिती
काय असते ब्लू सुपरमून?
अंतराळात होणाऱ्या खगोलीय घटनांमुळे न्यू मून, फुल मून, सुपर मून आणि ब्लू मून अशा घटना दिसत असतात. दोन ते तीन वर्षातून अशा खगोलीय घटना घडत असतात. इतर दिवसांच्या तुलनेत अशा घटनावेळी चंद्राचा आकार हा वाढत असतो आणि त्याचा रंग वेगळा असतो. तर एका महिन्यांत दोन फुल मून निघत असतात. त्यामधील दुसऱ्यांदा निघणारा फुल मून म्हणजेच पूर्ण चंद्र हा ब्लू मून म्हणून म्हटल्या जातो. याआधी 2018 मध्ये ब्लू मून म्हणजेच निळा चंद्र दिसला होता. एकुणच सोप्या भाषेत समजून घ्यायचे असेल तर जर एकाच महिन्यांत दोनपेक्षा अधिकवेळा पोर्णिमा आल्या तर त्या वर्षाला मून इअर म्हणजेच चंद्र वर्ष असे संबोधले जाते. अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था नासानुसार, अशा घटनांवेळी चंद्र हा सामान्य दिवसांच्या तुलनेत अधिक प्रकाशित दिसतो आणि तो पृथ्वीच्या अधिक जवळ असतो.
हेही वाचा : China New Map : ड्रॅगनची नवी कुरापत; नव्या नकाशात अरुणाचल प्रदेश, तैवानसह ‘या’ भागांवरही दाखवला हक्क
भविष्यात दिसणाऱ्या ब्लू मून(निळा चंद्र) च्या तारखा आणि वर्ष
उद्या 30 ऑगस्ट 2023 रोजी चंद्र निळा दिसेल. तर 31 मे 2026 रोजी आणि त्यानंतर 31 डिसेंबर 2028 रोजी चंद्र निळा दिसणार आहे.
ब्लू सुपरमून पाहण्याचा सर्वात चांगली वेळ कोणती?
उद्या 30 ऑगस्ट रोजी दिसणारा निळ्या चंद्राच्या हे अविस्मरणीय दृष्य पाहायचे असेल तर 30 ऑगस्ट रोजी रात्री ठिक 8 वाजून 37 मिनिटांनी चंद्र हा सुपर ब्लू मून अधिक प्रकाशित आणि मोठा दिसणार आहे. जेव्हा असा चंद्र निघणार तेव्हा आपल्याकडे दिवस असणार आहे. असा चंद्र हा अमेरिकेत दिसणार आहे. भारतीय याला लाईव्ह पाहून नजरेत कैद करू शकतात.