Eco friendly bappa Competition
घर देश-विदेश 2024 मधील शैक्षणिक सत्रात दोन वेळा होणार बोर्डाच्या परीक्षा; 11वी-12 वीच्या विद्यार्थ्यांना...

2024 मधील शैक्षणिक सत्रात दोन वेळा होणार बोर्डाच्या परीक्षा; 11वी-12 वीच्या विद्यार्थ्यांना शिकाव्या लागतील दोन भाषा

Subscribe

नवीन अभ्यासक्रम आराखडा शिक्षण मंत्रालयाने जाहीर केला आहे. शिक्षण मंत्रालयाच्या नवीन अभ्यासक्रमाच्या आराखड्यानुसार बोर्डाच्या परीक्षा वर्षातून दोनदा घेतल्या जातील.

नवी दिल्ली : केंद्र सरकारने बुधवारी जाहीर केलेल्या त्यांच्या नव्या शिक्षण नितीमध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत. यामध्ये आगामी शैक्षणिक सत्रात क्रमिक पाठ्यपुस्तके विकसीत केली जाणार आहेत. असे जरी असले तरी याच शिक्षण प्रणालीमध्ये आता बोर्डाच्या परीक्षा दोन वेळा होणार आहेत. तर अकरावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना नव्या दोन भाषा शिकाव्या लागणार आहेत हे विशेष.(The board exams will be held twice in the academic session in 2024 Students of class 11-12 have to learn two languages)

नवीन अभ्यासक्रम आराखडा शिक्षण मंत्रालयाने जाहीर केला आहे. शिक्षण मंत्रालयाच्या नवीन अभ्यासक्रमाच्या आराखड्यानुसार बोर्डाच्या परीक्षा वर्षातून दोनदा घेतल्या जातील. एवढेच नाही तर विद्यार्थ्यांना उत्तम गुण कायम ठेवण्याची मुभा असेल. शिक्षण मंत्रालयाच्या नवीन अभ्यासक्रमाच्या आराखड्यांतर्गत, बोर्ड परीक्षांमुळे अनेक महिन्यांचे कोचिंग आणि रॉट लर्निंगच्या तुलनेत विद्यार्थ्यांची समज आणि प्रावीण्य पातळीचे मूल्यांकन केले जाणार आहे.

विषयाची निवड अनिवार्य नसणार

- Advertisement -

शिक्षण मंत्रालयाच्या नवीन अभ्यासक्रमाच्या आराखड्यानुसार, इयत्ता 11वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या विषयांची निवड करणे अनिवार्य नसणार आहे. तर विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीचा विषय निवडण्याचे स्वातंत्र्य दिले जाणार आहे. शिक्षण मंत्रालयाच्या या नवीन अभ्यासक्रमानुसार शाळा मंडळे योग्य वेळी मागणीनुसार’ परीक्षा देण्याची क्षमता विकसित करणार आहेत.

हेही वाचा : महाराष्ट्रात येऊन पक्षप्रवेशाची ऑफर देणाऱ्या BRSने नाकारले उपमुख्यमंत्र्याना तिकीट अन् ‘ते’ ढसाढसा रडले..

दोन भाषा शिकाव्या लागतील

- Advertisement -

केंद्र सरकारने जाहीर केलेल्या त्यांच्या नव्या शिक्षा नितीमधअये पुढील 2024 च्या वर्षातील शैक्षणिक सत्रासाठी नवी पाठ्यपुस्तके तयार केली जाणार असल्याचे म्हटले आहे. नव्या शिक्षा नितीनुसार नव्या अभ्यासक्रमात 11 वी आणि 12 वीच्या विद्यार्थ्यांना दोन भाषा शिकाव्या लागणार आहेत. यामध्ये एक भाषा ही भारतीय असावी लागणार आहे.

हेही वाचा : Chandrayaan-3 बाबत विक्रम साराभाई यांच्या मुलाने व्यक्त केला आनंद, म्हणाले…

पाठ्यपुस्तकांचे दर कमी होणार

आज केंद्र सरकारने जाहीर केलेल्या नव्या शिक्षा नितीनुसार, लवकरच नवी पुस्तके तयार होणार आहेत. तर पुढील शैक्षणिक सत्रातील पुस्तकांच्या किंमती या कमी केल्या जाणार असल्याचेही म्हटले आहे.

- Advertisment -