घरताज्या घडामोडीफोटोग्राफरचा मृतदेह ३ दिवस होता लटकलेल्या अवस्थेत, धक्कादायक कारण आलं समोर!

फोटोग्राफरचा मृतदेह ३ दिवस होता लटकलेल्या अवस्थेत, धक्कादायक कारण आलं समोर!

Subscribe

उत्तर प्रदेशमधील मुझफ्फरपूर शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. ब्रह्मपुरा पोलिस स्टेशन परिसरातील दौडपूर कोठी मोहल्ला येथील ठाकूर लॉजमध्ये एका फोटोग्राफरने आत्महत्या केली आहे. दीपक कुमार (वय ३६) असं या फोटोग्राफरचं नाव आहे. मात्र तब्बल ३ दिवसानंतर या फोटोग्राफरने आत्महत्या केल्याचं समोर आलं. धक्कादायकबाब म्हणजे या फोटोग्राफरची बहिण त्याच लॉजमधील दुसऱ्या खोलीत राहत होती.

रविवारी त्या खोलीतून दुर्गंधी येऊ लागल्यामुळे फोटोग्राफरच्या बहिणीला काहीतरी अनुसुचित प्रकार घडल्याचा संशय आला.  खोलीचे दार ठोठावले असता आतून काहीज आवाज आला नाही. लॉजमधील इतर लोकांनी दरवाजा ढकलला तेव्हा आतून कडी उघडली. तर फोटोग्राफरचा मृतदेह लटकताना दिसला.

- Advertisement -

ही माहिती मिळताच ब्रह्मपुरा पोलिस ठाण्याचे पोलिस घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह पोस्टमार्टमसाठी रुग्णालयात पाठविण्यात आला. बहिणीने पोलिसांना सांगितले आहे की तिचा भाऊ पूर्वी दिल्लीमध्ये राहत होता. दोन्ही पालकांचे आधीच निधन झाले आहे. जानेवारीत ते मुझफ्फरपूरला आले होते. यानंतर तो इथे यायचा आणि छायाचित्रण करायचा. काही दिवसांपासून तो आजारी होता. गेली तीन दिवस खोली बंद होती. रविवारी खोलीतून दुर्गंधी येत होती म्हणून दरवाजा उघडला असता त्याचा मृतदेह लटकताना दिसला.

ब्रह्मपुरा पोलिस ठाण्याचे विश्वनाथ राम यांनी सांगितले की, खोलीतून अद्याप कोणतीही सुसाइड नोट सापडली नाही. काही दिवसांपूर्वी दीपकचा मोबाइलही हरवला होता. नैराश्यात या युवकाने आपला जीव गमावला असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यानंतरच खरं कारण समोर येईल. या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल व पुढील कारवाईही केली जाईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -