घर देश-विदेश कफल्लक माणसाचा दिलदारपणा; मंदिर व्यवस्थापनही चक्रावले; वाचा- काय आहे प्रकरण?

कफल्लक माणसाचा दिलदारपणा; मंदिर व्यवस्थापनही चक्रावले; वाचा- काय आहे प्रकरण?

Subscribe

दक्षिण भारतात अनेक देवी-देवतांची मंदिरे आहेत. या मंदिरात देशभराच्या कानाकोपऱ्यातील भाविका दर्शनासाठी तर कुणी कबुल केलेले नवस फेडण्यासाठी दाखल होतात.

विशाखापट्टणम : मंदिरांचा देश म्हणून आपल्या देशाची ओळख आहे. अगदी 33 कोटी देवदेवीतांची मंदिरे आपल्या देशात अनादी काळापासून स्थापीत आहेत. या मंदिरातील देवी-देवतांविषयी असलेली भाविकांमधील श्रद्धाही अनेकवेळा आश्चर्यचकीत करणारीच असते. मात्र, दक्षिण भारतातील विशाखापट्टणममधील एक वेगळाच प्रकार घडला आहे. एका भाविकांने त्याच्या श्रद्धेपोटी मंदिराच्या दानपेटीत चक्क 100 कोटी रुपयांचा धनादेश (चेक) टाकला आणि आपले दानकर्म पूर्ण केले. पंरतू जेंव्हा मंदिर प्रशासनाने तो चेक बॅंकेत वठवण्यासाठी दिला तेंव्हा त्या दानकर्त्यां भाविकांच्या बॅंक खात्यात केवळ 22 रुपये असल्याचे दिसून आले. तेव्हा एका कफल्लक माणसाच्या दिलदारपणामुळे मंदिर प्रशासनही चक्रावून गेले होते. (The bravery of a kafalak man; The temple management was also confused; Read- What’s the matter?)

दक्षिण भारतात अनेक देवी-देवतांची मंदिरे आहेत. या मंदिरात देशभराच्या कानाकोपऱ्यातील भाविका दर्शनासाठी तर कुणी कबुल केलेले नवस फेडण्यासाठी दाखल होतात. अशातीलच एक विशाखापट्टणममधील सिम्हाचलम मंदिरात एका भाविकांने त्याच्या श्रद्धपोटी देवस्थानाला शंभर कोटी रुपये देऊ केले. ती त्याची प्रांजळ इच्छा होती. मात्र, तेव्हा मंदिर प्रशासनाने दानपेटी खोलून आलेले दान मोजले तेव्हा इतर दानासोबत त्या कफल्लक भाविकाचा तो शंभर कोटीचा धनादेशही मिळून आला. परंतू जेंव्हा तो चेक वठवण्यासाठी बॅंकेत दिला तेंव्हा वेगळीच माहिती समोर आली.

हा एकमेव प्रकार नाही

- Advertisement -

सिम्हाचलम मंदिर प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, मंदिर प्रशासनासोबत घडलेला हा पहिला प्रकार नसून, याआधीही अनेक भाविकांनी असे खोटे दान देण्याचा प्रयत्न केला आहे. याआधी एका भाविकाने असेच भलेमोठे दान देण्याचा प्रयत्न केला होता मात्र, जेंव्हा सत्य उघड झाले होते तेंव्हा त्या भाविकाच्या खात्यात फक्त 17 रुपये असल्याचे दिसून आले होते.

हेही वाचा : Chandrayan 3 चा चंद्रावर फेरफटका; प्रवास करताना सोडणार भारताच्या ‘या’ खुणा

मंदिर प्रशासन म्हणते…तर आम्ही भाग्यशाली असतो

- Advertisement -

एका व्यावासायिक बॅकेचे नाव असलेल्या या चेकवर बोड्डेपल्ली राधाकृष्ण नावाच्या व्यक्तीची स्वाक्षरी आहे. हस्ताक्षर असलेला चेक मंदिर प्रशासनाचे कार्यकारी अध्यक्ष त्रिनाधा राव यांच्याकडे घेऊन गेल्यानंतर त्यांनी म्हटले की, अंकात आणि अक्षरात रक्क व्यवस्थित लिहलेली आहे. जर हा चेक कॅश झाला तर आपण भाग्यशाली ठरू असे म्हटले होते. मात्र, जाले ते उलटेच. कारण दान करणाऱ्या बड्डेपल्ली राधाकृष्ण यांच्या खात्यात फक्त 22 रुपये निघाले.

हेही वाचा : Lok Sabha Survey : देशात सद्यपरिस्थितीत लोकसभेच्या निवडणुका झाल्या तर ‘असा’ असेल निकाल

कारवाई केली जात नाही

अशा मोठ्या रक्कमेच्या आलेल्या दानाचे चेक आणि त्या दानकर्त्यांवर चेक बाऊंसचा खटला दाखल केला जातो का असे विचारण्यात आल्यानंतर मंदिर प्रशासनाने सांगितले की, अशा घटनांकडे मंदिर प्रशासन दुर्लक्ष करते कारण, अशा कृती कुठल्याही चुकीच्या भावनेने केल्या जात नाही तर त्या शुद्ध भावनेपोटी केल्या जातात.

- Advertisment -