सप्तपदी सुरु असताना नवरीचा लग्नाला नकार; म्हणाली नवरदेव पसंत नाही

नवी दिल्ली : लग्न सोहळा हा प्रत्येकाच्या आयुष्यातील आनंदाचा क्षण असतो. पण अनेकदा पाहिले आहे विचित्र कारणामुळे सप्तपदी सुरू असताना किंवा त्याआधी लग्न मोडताना आपण पाहिले आहे. असाच प्रकार बिहारमध्ये समोर आला आहे. दोन फेरे मारल्यानंतर नवरीने अशी भूमिका घेतली केली की, वधु आणि वर पक्षामध्ये बाचाबाची झाली आणि हे प्रकरण पोलीस स्टेशनला पोहचले.

लग्न सोहळा व्यवस्थित सुरू होता. भटजी मंगलाष्टका बोलत होते. पण दोन फेरे मारल्यानंतर नवरीने लग्न मोडण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे लग्नाच्या विधी थांबवण्यात आल्या. अचानक विधी थांबल्यामुळे लग्न मंडपात उपस्थित वऱ्हाडींना लग्न थांबल्याचे समजले आणि एकच गोंधळ उडाला. नवरीच्या आई-वडिलांनी आणि तिच्या नातेवाईकांनी खूप समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. तसेच मुलाकडील मंडळींनी देखील पुन्हा लग्न करण्यास विनवण्या केल्या. पण नवरी मुलगी आपल्या भूमिकेवर ठाम राहिली. त्यानंतर लग्न मोडल्याचे कारण समजल्यावर वऱ्हाडींना डोक्याला हात लागवण्याशिवाय पर्याय नव्हता.

पोलीस स्टेशनला पोहचले प्रकरण
नवरीने अचानक लग्न मोडल्यामुळे नवऱ्याची आणि त्याच्या कुटुंबाची चांगलीच फजिती झाली. त्यानंतर वधु आणि वर पक्षामध्ये प्रचंड बाचाबाची झाली आणि हे प्रकरण पोलीस स्टेशनला पोहचले. पोलिसांनी देखील नवरीला समजवण्याच्या प्रयत्न केला. मात्र, नवरी मुलगी त्याचेही एकूण घ्यायला तयार नव्हती. त्यामुळे पोलिसांनी दोन्ही पक्षांना या प्रकरणात सामजस्यांने तोडगा काढण्याच्या सूचना दिल्या.

लग्न मोडण्याचे अजब कारण
नवरदेव नवरीच्या गळ्यात वरमाला घालणार इतक्यात तिने लग्न मोडण्याचा निर्णय घेतला. मला या मुला सोबत लग्न करायचे नाही अशी भूमिका घेतली. यामुळे तिथे उपस्थित असलेल्या सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आणि लग्न का मोडले असेल अशी कुजबूज सुरू झाली. यानंतर नवरीला लग्न मोडण्यामागचे कारण विचारले असता तिने सांगितले की, नवरा काळा आहे म्हणून  मला लग्न करायचे नाही. यानंतर मुलीचे कुठे तरी प्रेमप्रकरण असेल म्हणून तिने लग्न मोडल्याचा आरोप नवरदेवाच्या नातेवाईकांकडून करण्यात येत आहे.