नवी दिल्ली: संसदेचे चालू अर्थसंकल्पीय अधिवेशन शनिवारपर्यंत एक दिवसाने वाढवण्यात आले आहे. संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी ही माहिती दिली. भारतीय जनता पक्षाने आपल्या लोकसभा आणि राज्यसभेतील आपल्या सर्व सदस्यांना उद्या, 10 फेब्रुवारीला सभागृहात उपस्थित राहण्यास सांगितलं आहे. भाजपचे राज्यसभेतील मुख्य व्हीप लक्ष्मीकांत बाजपेयी यांनी पक्षाच्या खासदारांना तीन ओळींचा व्हिप जारी केला आहे. (The budget session of Parliament has been extended by one day Parliamentary Affairs Minister Prahlad Joshi gave this information)
लक्ष्मीकांत बाजपेयी यांनी जारी केलेल्या पत्रात म्हटलं आहे की, भाजपाच्याा सर्व राज्यसभा खासदारांना सूचित करण्यात येते की, शनिवार, 10 फेब्रुवारी 2024 रोजी राज्यसभेत काही अत्यंत महत्त्वाचे कामकाज होणार आहे. त्यामुळे भाजपाच्या सर्व सदस्यांनी शनिवारी दिवसभर सभागृहात उपस्थित राहून सरकारला पाठिंबा द्यावा, असं आवाहन करण्यात येत आहे.
राष्ट्रपतींचे भाषण 31 जानेवारी 2024 रोजी संसदेत झाले होते. यापूर्वी 2 फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरकारच्या रणनीतीवर चर्चा करण्यासाठी संसदेत सर्वोच्च मंत्र्यांसोबत बैठक घेतली होती.
केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शहा, संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी, केंद्रीय मंत्री अनुराग सिंह ठाकूर, केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी आणि केंद्रीय कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल या बैठकीला उपस्थित होते. गुरुवारी सरकारने 2024-25 चा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला.
सर्वसमावेशक विकासाला चालना देणाऱ्या, उत्पादकता सुधारणाऱ्या आणि समाजातील विविध घटकांसाठी संधी निर्माण करणाऱ्या आर्थिक धोरणांवर अर्थसंकल्पाचा भर असल्याचे मोदी सरकारने म्हटले आहे. 2047 पर्यंत भारताला विकसित देश बनवण्याच्या उद्देशाने छत्तीसगड, ओडिशा आणि पश्चिम बंगालला विकास इंजिन बनवले जाईल, असंही म्हटलं.
BJP Chief Whip in the Rajya Sabha, Laxmikant Bajpai issues a three-line whip to party MPs to be present in the Rajya Sabha on 10th February to support the government's stand. pic.twitter.com/XTVT0ciwi5
— ANI (@ANI) February 9, 2024
निर्मला सीतारामन यांनी NDA पुन्हा सत्तेत येण्याचा विश्वास व्यक्त केला. मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील हा शेवटचा अर्थसंकल्प होता आणि या वर्षी एप्रिल-मेमध्ये लोकसभा निवडणुका होण्याची अपेक्षा आहे. लोकसभेत आपला सहावा अर्थसंकल्प सादर करणाऱ्या सीतारामन यांनी भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए पुन्हा सत्तेत येण्याचा विश्वास व्यक्त केला.
(हेही वाचा: Chitra Wagh On Thackeray : तत्कालीन सरकारची लक्तरेही आम्हाला…; चित्रा वाघ यांचा ठाकरेंवर निशाणा)