नियोजित वेळेच्या एक दिवस आधी संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आज संपुष्टात येण्याची शक्यता

अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा १४ मार्चपासून सुरू झाला. पूर्वनिर्धारित वेळापत्रकानुसार अर्थसंकल्पीय अधिवेशन ८ एप्रिल रोजी संपणार होते. अर्थसंकल्पीय प्रक्रियेव्यतिरिक्त दिल्ली महापालिका (दुरुस्ती) विधेयक आणि फौजदारी प्रक्रिया (ओळख) विधेयकासह काही महत्त्वपूर्ण विधेयके देखील अधिवेशनादरम्यान मंजूर करण्यात आलीत.

नवी दिल्ली : संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन नियोजित वेळेच्या एक दिवस आधी गुरुवारी संपुष्टात येण्याची शक्यता आहे. लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांचे कामकाज एकाच वेळी तहकूब केले जाऊ शकते, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळालीय. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला टप्पा 31 जानेवारीला सुरू झाला आणि केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर 11 फेब्रुवारीला संपला. यानंतर अर्थसंकल्पीय पेपर तपासणीसाठी दोन्ही सभागृहात सुट्टी जाहीर करण्यात आली.

अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा मार्चमध्ये सुरू झाला

अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा १४ मार्चपासून सुरू झाला. पूर्वनिर्धारित वेळापत्रकानुसार अर्थसंकल्पीय अधिवेशन ८ एप्रिल रोजी संपणार होते. अर्थसंकल्पीय प्रक्रियेव्यतिरिक्त दिल्ली महापालिका (दुरुस्ती) विधेयक आणि फौजदारी प्रक्रिया (ओळख) विधेयकासह काही महत्त्वपूर्ण विधेयके देखील अधिवेशनादरम्यान मंजूर करण्यात आलीत.

युक्रेनवरील चर्चेचे पंतप्रधानांनी कौतुक केले

बुधवारी लोकसभेत युक्रेनमधील सद्यस्थितीवर चर्चा झाली. चर्चेच्या महत्त्वाबाबत पंतप्रधान मोदी म्हणाले की, सभागृहातील उच्च पातळीवरील चर्चेवरून असे दिसून येते की, परराष्ट्र धोरणाच्या मुद्द्यांवर एकमत आहे जे जागतिक स्तरावर भारतासाठी चांगले आहे. पंतप्रधानांनी ट्विट केले की, गेल्या काही दिवसांत युक्रेनमधील परिस्थिती आणि ऑपरेशन गंगाद्वारे भारतीय नागरिकांना परत आणण्याच्या प्रयत्नांवर संसदेत चांगली चर्चा झाली. ही चर्चा आपल्या विचारांनी समृद्ध करणाऱ्या सर्व खासदार सहकाऱ्यांचा मी ऋणी आहे.

अमित शहा यांनी विरोधकांवर ताशेरे ओढले

गुन्हेगारी प्रक्रिया मान्यता विधेयकाला विरोध करणाऱ्या विरोधकांचा गृहमंत्री अमित शहा यांनी खरपूस समाचार घेतला. या विधेयकावरील चर्चेला वरिष्ठ सभागृहात उत्तर देताना गृहमंत्री म्हणाले की, विरोधकांनी सरकारच्या प्रत्येक कामाकडे संशयाने पाहू नये. हे विधेयक आणण्यामागे एकच उद्देश आहे, जेणेकरून गुन्हेगारांविरुद्ध ठोस इलेक्ट्रॉनिक पुरावे गोळा करून त्यांना लवकरात लवकर शिक्षा करता येईल.


हेही वाचाः Fuel Price Hike : वाढत्या महागाईविरोधात काँग्रेसचं आज देशभरात आंदोलन; हजारो कार्यकर्ते उतरणार रस्त्यावर