घरक्राइमबस अचानक सुरू होऊन फलाटावर चढली अन् तीन जणांना चिरडून गेली; व्हिडीओ...

बस अचानक सुरू होऊन फलाटावर चढली अन् तीन जणांना चिरडून गेली; व्हिडीओ होतोय व्हायरल

Subscribe

तुम्ही बसची वाट पाहत बसस्थानाकामध्ये बसलेले आहात. अशातच एक बस अचानक सुरू होऊन थेट फलाटावर चढते आणि प्रवाशांना चिरडून जाते. ही कल्पनासुद्धा किती भयावह आहे.

आंध्र प्रदेश (विजयवाडा) : तुम्ही बसची वाट पाहत बसस्थानाकामध्ये बसलेले आहात. अशातच एक बस अचानक सुरू होऊन थेट फलाटावर चढते आणि प्रवाशांना चिरडून जाते. ही कल्पनासुद्धा किती भयावह आहे. परंतू अशी घटना घडली आहे. आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथे झालेल्या भीषण अपघातात तिघांना जीव गमवावा लागला. या घटनेचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. (The bus suddenly started up the platform and crushed three people The video is going viral)

सोमवारी (6 नोव्हेंबर) रोजी आंध्र प्रदेश राज्य मार्ग परिवहन महामंडळ (APSRTC) बस अचानक शहरातील बस टर्मिनसच्या प्लॅटफॉर्मवर चढली आणि तेथे वाट पाहणाऱ्या प्रवाशांच्या अंगावर चढली. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय. एस. जगन मोहन रेड्डी यांनी येथील पंडित नेहरू बस टर्मिनस येथे झालेल्या अपघाताबद्दल शोक व्यक्त केला आणि मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 10 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.

- Advertisement -

सोमवारी सकाळी 8 वाजून मिनिटांच्या सुमारास आरटीसी बसने प्लॅटफॉर्म क्रमांक 12 ला धडक दिली आणि तीन जणांना चिरडले. या अपघातात जखमी झालेल्या 18 महिन्यांच्या मुलीचा येथील रुग्णालयात मृत्यू झाला. प्रादेशिक व्यवस्थापक एम. येशु दानम म्हणाले की, वाहन पलटवण्याऐवजी चालकाने ते पुढे ढकलले आणि बस प्लॅटफॉर्मवर धडकली. मुख्यमंत्र्यांनी संतप्त कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त केल्या आणि जखमींवर योग्य उपचार करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. मुख्यमंत्री कार्यालयाकडून (सीएमओ) जारी करण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे की, मुख्यमंत्र्यांनीही या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

- Advertisement -

हेही वाचा : क्रौर्याची परिसीमा : पत्नीला 17 वेळा चाकूने भोकसले, अंगावरून गाडीही घातली; शेवटी कोर्टाने…

तेलुगू भाषिक राज्यांना जोडणारे बसस्थानक

एपीएसआरटीसीचे कार्यकारी संचालक (ऑपरेशन्स) ए. कोटेश्वर राव म्हणाले की, दोन जखमींच्या उपचाराचा खर्च रस्ते वाहतूक महामंडळ उचलणार आहे. विजयवाडा बस स्थानक हे आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या दोन्ही तेलुगू भाषिक राज्यांना जोडणारे प्रमुख कनेक्टिव्हिटी केंद्र आहे. आणि विजयवाडा-गुंटूर बस सेवा ही प्रमुख सेवा आहे. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून याप्रकरणी गुन्हा दाखल केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -