घरताज्या घडामोडीमोदींच्या पंजाब दौऱ्यात झालेल्या चुकीला केंद्र की राज्य सरकार जबाबदार ; मलिकांचा...

मोदींच्या पंजाब दौऱ्यात झालेल्या चुकीला केंद्र की राज्य सरकार जबाबदार ; मलिकांचा सवाल

Subscribe

पंतप्रधानांच्या सुरक्षेत चूक होणे हा गंभीर विषय आहे, त्यामुळे या प्रकरणी केंद्र किंवा राज्य सरकारने तपास न करता हायकोर्टाच्या सिटींग न्यायाधीशांच्या माध्यमातून तपास व्हावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केलीय.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेत झालेल्या चुकीनंतर राजकीय वातावरण प्रचंड तापलेय. त्यानंतर आता राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी या प्रकरणी काही प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत. पंतप्रधान यांच्या सुरक्षेमध्ये होणाऱ्या चुकीसाठी केंद्र सरकारची सुरक्षा यंत्रणा की पंजाब राज्य सरकारची यंत्रणा कारणीभूत आहे, असा सवाल नवाब मलिक यांनी उपस्थित केलाय. नवाब मलिकांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधलाय, त्यावेळी ते बोलत होते.

पंतप्रधानांच्या सुरक्षेत चूक होणे हा गंभीर विषय आहे, त्यामुळे या प्रकरणी केंद्र किंवा राज्य सरकारने तपास न करता हायकोर्टाच्या सिटींग न्यायाधीशांच्या माध्यमातून तपास व्हावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केलीय. पंतप्रधानांच्या सुरक्षेत चूक झाल्यानंतर भाजप आणि काँग्रेसने राजकारण करायला सुरुवात केलीय. मात्र या सुरक्षेची जबाबदारी एसपीजी, आयबी आणि राज्य सरकार पोलीस या तिघांची असते. त्यामुळे चूक कुणाकडून झाली हे जेव्हा हायकोर्टाच्या सिटींग न्यायाधीशांच्या माध्यमातून तपास होईल तेव्हा सत्य काय आहे हे देशाच्या जनतेसमोर येईल, असेही नवाब मलिक म्हणाले.

- Advertisement -

नेमकं काय आहे प्रकरण?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बुधवारी पंजाबमधील फिरोजपूर येथे होणारी सभा सुरक्षा यंत्रणेतील त्रुटींमुळे ऐनवेळी रद्द करण्यात आली. पंजाबमधील हुसैनीवाला येथील राष्ट्रीय शहीद स्मारकापासून सुमारे 30 किमी अंतरावर पंतप्रधानांचा ताफा फ्लायओव्हरवर पोहोचला तेव्हा काही आंदोलकांनी रस्ता अडवला. त्यामुळे कार्यक्रमस्थळी जाणार्‍या पंतप्रधानांचा ताफा एका फ्लायओव्हरवर सुमारे 15 ते 20 मिनिटे अडकून पडला होता.

 

- Advertisement -

हे ही वाचा – मुंबईतील विहिरींतून ८० कोटीचे पाणी चोरणाऱ्यांवर कारवाई करा, आशिष शेलारांची पालिका आयुक्तांकडे मागणी


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -