घरदेश-विदेशजनतेचा खिसा रिकामा करत केंद्राने १० महिन्यांत पेट्रोल-डिझेलच्या करातून २ लाख कोटींचं...

जनतेचा खिसा रिकामा करत केंद्राने १० महिन्यांत पेट्रोल-डिझेलच्या करातून २ लाख कोटींचं केलं संकलन

Subscribe

गेल्या सहा वर्षांत केंद्र सरकारचा पेट्रोल आणि डिझेलवरील कर संग्रह ३०० टक्क्यांहून अधिक आहे. सोमवारी सरकारने लोकसभेत ही माहिती दिली. केंद्र सरकारने गेल्या १० महिन्यांत पेट्रोल-डिझेलच्या करातून २ लाख ९४ हजार कोटींचं संकलन केलं आहे. मोदी सरकार येण्यापूर्वी २०१४-१५ मध्ये पेट्रोल कर शुल्कातून २९ हजार २७९ कोटी आणि डिझेल कर शुल्कातून ४२ हजार ८८१ कोटी एवढं संकलन केलं आहे, अशी माहिती वित्त राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी लोकसभेत लेखी उत्तरात दिली.

संग्रह वाढला

चालू आर्थिक वर्ष २०२०-२१ च्या पहिल्या दहा महिन्यांत पेट्रोल आणि डिझेलवरील कर संकलन २.९४ लाख कोटींवर पोहचलं असल्याचं अनुराग ठाकूर यांनी सांगितलं. त्याचबरोबर, पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती फेब्रुवारी महिन्यात दररोज वाढत आहेत, मार्च महिन्यात त्यांच्या किंमतींमध्ये कोणतीही वाढ झालेली नाही.

- Advertisement -

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती फेब्रुवारी महिन्यात सातत्याने वाढत असताना गेल्या २३ दिवसांपासून मार्च महिन्यात कोणतीही वाढ झालेली नाही. सध्या दिल्लीत डिझेलची किंमत प्रतिलिटर ८१.४७ रुपये आहे, तर पेट्रोल ९१.१७ रुपये प्रतिलिटर आहे. याशिवाय देशातील चार महानगरांमध्ये समाविष्ट असलेल्या मुंबईत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणतीही वाढ दिसून आलेली नाही. मुंबईत डिझेलची किंमत प्रति लिटर ८८.६० रुपये तर पेट्रोलची किंमत ९७.५७ रुपये प्रतिलिटर आहे. कोलकातामध्ये डिझेल प्रति लिटर ८४.३५ रुपये आणि पेट्रोल ९१.३५ रुपये आहे.

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -