घरदेश-विदेशघरोघरी जाऊन लसीकरणाचा प्रस्ताव केंद्र सरकारने फेटाळला

घरोघरी जाऊन लसीकरणाचा प्रस्ताव केंद्र सरकारने फेटाळला

Subscribe

एखाद्या व्यक्तीचे लसीकरण केल्यानंतर त्या व्यक्तीवर लसीचा काही दुष्परीणाम होतोय का हे पाहणे गरजेचे आहे. घरोघरी जाऊन लसी दिल्या तर एका व्यक्तीला लस देण्यासाठी बराच वेळ लागू शकतो. या पद्धतीने लसीकरण मोहिमेचा वेग मंदावेल, असे कारण देत केंद्र सरकारने मुंबई महानगरपालिकेचा घरोघरी जाऊन लस देण्याचा प्रस्ताव फेटाळून लावला आहे. तसेच घरोघरी जाऊन लस देण्यासंदर्भात केंद्र सरकारचे कोणतेही धोरण नसल्याचेही स्पष्ट केले आहे.

मुंबईमध्ये जवळजवळ दीड लाख लोक अशी आहेत जी अंथरुणाला खिळून आहेत किंवा अपंग आहेत. ही लोक लस घेण्यासाठी लसीकरण केंद्रापर्यंत जाऊ शकत नाहीत. याच लोकांना घरी जाऊन लस देण्यासंदर्भात आम्ही केंद्र सरकारकडे परवानगी मागितली होती. मात्र, केंद्र सरकारच्या अधिकार्‍यांनी केंद्राची असे कोणतेही धोरण नाही असे आम्हाला सांगितल्याची माहिती मुंबई महापालिकेचे अतिरिक्त सचिव (आरोग्य) सुरेश काकानी यांनी दिली.

- Advertisement -

मात्र, केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी तळागाळातील लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी (बूथ पद्धतीने) कोरोना लसीकरणाची विशेष मोहीम राबवली जाण्यासंदर्भात माहिती दिली होती. लोकांना दोन किमीपेक्षा अधिक प्रवास करावा लागू नये म्हणून ही मोहीम राबवली जाण्यासंदर्भातील भाष्य आरोग्यमंत्र्यांनी केले होते.

दिवसाला १० हजार रुग्ण सापडतील
मुंबईमध्ये वाढणार्‍या कोरोना रुग्णांसंदर्भात केंद्र सरकारने चिंता व्यक्त केली आहे. सध्या कोरोना संसर्गाचा वेग पाहता लवकरच मुंबईमध्ये दिवसाला १० हजार कोरोना रुग्ण सापडतील अशी भीती या अधिकार्‍याने व्यक्त केलीय. देशाच्या आर्थिक राजधानातील कोरोना परिस्थिती गंभीर होण्यासंदर्भातील चिंता व्यक्त केली जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -