घरदेश-विदेशमोठी घोषणा! केंद्र सरकार आज रात्रीपर्यंत राज्यांना देणार २० हजार कोटी रुपये

मोठी घोषणा! केंद्र सरकार आज रात्रीपर्यंत राज्यांना देणार २० हजार कोटी रुपये

Subscribe

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांच्या अध्यक्षतेखाली आज, सोमवारी ४२ वी जीएसटी परिषदेची बैठक पार पडली. या वर्षी जमा झालेला क्षतिपूर्ती उपकर पुढच्या काही तासात राज्यांमध्ये वितरीत केला जाईल, अशी घोषणा अर्थमंत्री सीतारमन यांनी या बैठकीनंतर केली. या वर्षी क्षतिपूर्ती उपकरापोटी २० हजार कोटी रुपये जमा झाले आहेत. लॉकडाऊनमुळे तिजोरीत खडखडाट असलेल्या राज्यांसाठी हा एक छोटासा दिलासा असणार आहे. पाच कोटींपेक्षा कमी उलाढाल असलेल्या कंपन्यांना दर महिन्याला रिर्टन फाइल करण्याची आवश्यकता नाही, अशी मोठी घोषणाही अर्थमंत्र्यांनी यावेळी केली आहे.

- Advertisement -

काय म्हणाल्या निर्मला सीतारमण

ज्यावेळी जीएसटी कायदा बनवणयात आला, तेव्हा कोविड-१९ सारख्या साथीच्या आजाराचा विचार करण्यात आला नव्हता. राज्यांना आम्ही नुकसान भरपाई नाकारलेली नाही. कोणीही नुकसान भरपाई नाकारलेली नाही. कर्ज काढावं लागेल. कसं आणि कधी कर्ज काढायचं ते राज्यांना ठरवाव लागेल. २० राज्यांनी कर्जाचा प्रस्ताव स्वीकारला आहे.

- Advertisement -

दरम्यान, या बैठकीत लक्झरी आणि अन्य प्रकारच्या वस्तूंवर लागणारा कम्पनसेशन सेस २०२२ पासूनही पुढे वाढवण्यात येईल, असे निश्चित करण्यात आले आहे. राज्यांना नुकसानीपासून वाचवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. नियमानुसार कम्पनसेशन सेस हा जीएसटी लागू झाल्यानंतर पाच वर्षांपर्यंतच लागू करण्यात येईल, असे निश्चित झाले होते.

हेही वाचा –

उद्धव ठाकरेंच्या गुगलीवर भाजप पुन्हा क्लिन बोल्ड

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -