Thursday, June 24, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर देश-विदेश दिलासा! लवकरच देशात स्पाइक प्रोटीनयुक्त असणारी स्वस्त Corona Vaccine मिळणार

दिलासा! लवकरच देशात स्पाइक प्रोटीनयुक्त असणारी स्वस्त Corona Vaccine मिळणार

Related Story

- Advertisement -

भारतात कोरोनावर मात करण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भाव दरम्यान कोविशील्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन कोरोना लसीचे डोस नागरिकांना देण्याचे काम देशभर सुरू आहे. दरम्यान, आता भारत लवकरच आणखी एक स्वदेशी लस बाजारात आणणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यासाठी तिसर्‍या टप्प्यातील लसीकरण चाचणी सुरू आहे. या लसीसाठी सरकारने हैदराबादस्थित कंपनी बायोलॉजिकल कंपनीला त्याच्या ३० कोटी डोसच्या पुरवठ्यासाठी १५०० कोटी रुपये दिले आहेत. त्याचबरोबर या लसीला ‘कार्बेव्हॅक्स’ असे नाव देण्यात आले असल्याचे सांगितले जात आहे.

असं आहे या स्वदेशी लसीचे वैशिष्ट्य

या स्वदेशी लसीचे वैशिष्ट्य म्हणजे स्पाइक प्रोटीनपासून बनविलेली ही पहिली कोरोना लस आहे आणि देशातील इतर लसींच्या तुलनेत स्वस्त दरात ती लस नागरिकांना देण्यात येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कार्बोवॅक्स लस एक रिकॉबिनेंट प्रोटीन युक्त लस आहे, जी कोरोनाच्या पृष्ठभागावर सापडलेल्या प्रथिनेपासून बनविली जाते, जेव्हा व्हायरस आपल्या शरीरात प्रवेश करतो तेव्हा आपली रोगप्रतिकारक शक्ती त्यास व्हायरस मानून अँटीबॉडीज विकसित करण्यास सुरूवात करते. ज्यामुळे व्यक्ती आजारी पडण्याची शक्यता कमी होते. हेपेटायटीस बीची लसही याच पद्धतीने वापरली जात असल्याचे सांगितले जाते.

सर्वात स्वस्त असणार ही लस

- Advertisement -

भारतात आतापर्यंत फायझर, मोडर्ना, कोविशील्ड, स्पुटनिक व्ही, कोव्हॅक्सिन यांना मान्यता देण्यात आली आहे. यासह दिलासादायक म्हणजे लवकरच कार्बेव्हॅक्स ही कोरोनाची लस बाजारात दाखल होणा आहे. कोरोनाच्या इतर लसींप्रमाणेच कॉर्बेव्हॅक्सचे दोन डोस घेणे देखील आवश्यक असणार आहे. तर ही लस स्वस्त मार्गांनी बनविले गेली असल्यामुळे बाजारातही त्याची किंमत सर्वात कमी असणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही लस तयार करण्यासाठी ५० रुपयांपर्यंत खर्च झाला आहे, परंतु ही लस बाजारात २५० रुपयांत उपलब्ध होईल. यासंदर्भात बोलताना, जैविक कंपनीने सांगितले की, त्यांचे लक्ष्य लसीपासून नफा मिळवणे हा नाही तर लोकांची सेवा करणे हे आहे. यामुळे, इतर लसींच्या तुलनेत त्याचे दर कमी ठेवण्यात आले आहेत.


Corona Vaccine: कोव्हॅक्सिन आणि स्पुटनिक घेतलेल्यांना अमेरिकेत शिक्षणासाठी जायचे असेल तर…

- Advertisement -