एकनाथ शिंदेंकडून दिल्लीच्या महाराष्ट्रात सदनातील महापुरुषांच्या पुतळ्यांना अभिवादन

मुख्यमंत्री शिंदे दोन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर असून आज सकाळी त्यांनी महाराष्ट्र सदनाच्या दर्शनीभागात स्थित छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

eknath shinde delhi

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या दिल्ली दौऱ्यावर असताना त्यांनी दिल्लीतील महापुरुषांच्या पुतळ्यांना पुष्प अर्पण करून अभिवादन केले. (The Chief Minister Eknath shinde paid tributes to the full-sized Statue of leaders)

मुख्यमंत्री शिंदे दोन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर असून आज सकाळी त्यांनी महाराष्ट्र सदनाच्या दर्शनीभागात स्थित छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले. महाराष्ट्र सदनाच्या निवासी आयुक्त डॉ. निरुपमा डांगे, सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावार यावेळी उपस्थित होते.

eknath shinde delhi

सदनातील मुख्यमंत्री दालनाच्या शेजारी असलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच राज्यपालांच्या दालनाशेजारी स्थित क्रांतीज्योती महात्मा फुले यांच्या प्रतिमेस मुख्यमंत्र्यांनी पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

दरम्यान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. यावेळी रात्री साडेनऊ वाजता सुरू झालेली बैठक तब्बल सहा तासांनी म्हणजेच मध्यरात्री अडीच वाजता संपली. महाराष्ट्राच्या राजकारणाबाबत या तीन नेत्यांमध्ये प्रदीर्घ खलबतं झाली असल्याचं म्हटलं जात आहे.


तसेच, एकनाथ शिंदे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची भेट घेणार आहेत. या भेटीत मंत्रिमंडळ विस्ताराबाबत सखोल चर्चा होणार असल्याची शक्यता राजकीय विश्लेषकांनी वर्तवली आहे.