कधी काळी ज्या कंपनीने भारताला बनवले होते गुलाम, आता एक भारतीयच आहे त्याचा मालक

17 व्या शतकाच्या सुरुवातीला म्हणजे 1600 च्या सुमारास भारताच्या भूमीवर पहिले पाऊल टाकणाऱ्या या कंपनीने शेकडो वर्षे आपल्या देशावर राज्य केले. 1857 पर्यंत भारत या कंपनीच्या ताब्यात होता, ज्याला कंपनी राज या नावाने इतिहासात ओळखले जाते

east india company
east india company

नवी दिल्लीः संपूर्ण देश सोमवारी 75 वा स्वातंत्र्यदिनाचा साजरा करीत आहे. त्याची आठवण म्हणून गेल्या वर्षीपासून देशात ‘आझादी का अमृत महोत्सव’ साजरा केला जात आहे. 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाल्यापासून आजपर्यंतचा भारताचा प्रवास अतिशय रंजक राहिला आहे. या 75 वर्षांत भारत एक मोठी आर्थिक शक्ती म्हणून उदयास आला आहे. ज्या ‘ईस्ट इंडिया कंपनी’ने कधी काळी भारताला गुलाम बनवले होते, आज त्या कंपनीचा मालक एक भारतीयच बनला आहे, यावरून भारताच्या वाढत्या आर्थिक स्थितीचा अंदाज लावता येतो.

भारतात दोन शतके कंपनीचे राज्य

ईस्ट इंडिया कंपनीचे नाव कोणाला माहीत नसेल? 8वी ते10वी पर्यंत इतिहासाचा पाठ्यक्रम असलेल्या कोणालाही या कंपनीचे नाव चांगलेच माहीत असेल. जे कधी शाळेत गेले नाहीत त्यांनाही कंपनी राज नावाने ईस्ट इंडिया कंपनी माहीत आहे. 17 व्या शतकाच्या सुरुवातीला म्हणजे 1600 च्या सुमारास भारताच्या भूमीवर पहिले पाऊल टाकणाऱ्या या कंपनीने शेकडो वर्षे आपल्या देशावर राज्य केले. 1857 पर्यंत भारत या कंपनीच्या ताब्यात होता, ज्याला कंपनी राज या नावाने इतिहासात ओळखले जाते.

आता ती ई-कॉमर्स कंपनी बनली

मिळालेल्या माहितीनुसार, ईस्ट इंडिया कंपनी ही भारतातील पहिली कंपनी होती, जी भारतीय नसून ब्रिटिश होती. या कंपनीने भारतालाही गुलामगिरीचे बंधन घालायला लावले. एकेकाळी ही कंपनी शेतीपासून खाणकाम आणि रेल्वेपर्यंतची सर्व कामे करीत असे. परंतु भारताला गुलाम बनवणाऱ्या या ईस्ट इंडिया कंपनीचे मालक आता भारतीय वंशाचे उद्योगपती संजीव मेहता आहेत. ईस्ट इंडिया कंपनी विकत घेतल्यानंतर मेहता यांनी ते ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म बनवले. सध्या ही कंपनी चहा, कॉफी, चॉकलेट आदींची ऑनलाईन विक्री करते.

ईस्ट इंडिया कंपनीचे स्वतःचे सैन्य होते

ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना 1600 मध्ये 31 डिसेंबरला झाली. ही कंपनी स्थापन करण्यामागचा एकमेव उद्देश ब्रिटिश साम्राज्यवाद आणि वसाहतवादाला चालना देणे हा होता. ब्रिटनच्या त्या कालखंडाबाबत एक अतिशय लोकप्रिय म्हण आहे की, ब्रिटिश राजवटीत सूर्य कधीच मावळत नाही. सूर्याच्या प्रदक्षिणापेक्षा ब्रिटिश साम्राज्य मोठे करण्यात सर्वात महत्त्वाचे योगदान या ईस्ट इंडिया कंपनीचे होते. कंपनी मूळतः व्यवसाय करण्यासाठी स्थापन करण्यात आली होती, परंतु तिला युद्ध करण्याचा अधिकार यासारखे अनेक विशेषाधिकार मिळाले. कंपनीला हा अधिकार ब्रिटिश राजवटीने आपल्या व्यावसायिक हितसंबंधांचे रक्षण करण्यासाठी दिला होता. या कारणास्तव ईस्ट इंडिया कंपनीचे स्वतःचे शक्तिशाली सैन्य होते.

स्पेन आणि पोर्तुगालसह प्रतिस्पर्धी कंपनी

1600 च्या दरम्यान स्पेन आणि पोर्तुगाल साम्राज्यवाद आणि व्यापारासाठी स्पर्धा करीत होते. ब्रिटन आणि फ्रान्स हे उशिराने उतरले होते, पण वेगाने त्यांचे वर्चस्व वाढवत होते. पोर्तुगीज खलाशी वास्को द गामा भारतात आल्यानंतर युरोपात मोठा बदल झाला. वास्को द गामा जहाजात भारतीय मसाले घेऊन जात असे. भारतीय मसाले युरोपसाठी अद्वितीय होते. या मसाल्यापासून वास्को द गामाने अमाप संपत्ती मिळवली. यानंतर भारतीय मसाल्यांचा सुगंध युरोपभर पसरला. भारताच्या उत्कर्षाच्या चर्चांनी युरोपीय साम्राज्यवादी देशांनाही येथे वर्चस्व गाजवण्याची प्रेरणा दिली. ईस्ट इंडिया कंपनीने हे काम ब्रिटनच्या वतीने केले.

जहाज लुटून पहिला व्यापार

भारतातून मसाले घेऊन जाणारे पोर्तुगालचे जहाज लुटून या कंपनीला पहिले यश मिळाले. त्या लुटीत ईस्ट इंडिया कंपनीला 900 टन मसाले मिळाले. ते विकून कंपनीला प्रचंड नफा झाला. ही त्या काळातील पहिल्या चार्टर्ड संयुक्त स्टॉक कंपन्यांपैकी एक होती, म्हणजेच कोणताही गुंतवणूकदार सध्याच्या शेअर बाजारात सूचीबद्ध कंपन्यांप्रमाणे शेअरहोल्डर बनू शकतो. लुटलेल्या कमाईचा हिस्सा कंपनीच्या गुंतवणूकदारांनाही मिळाला. इतिहासाच्या पुस्तकात असे सांगितले आहे की, ईस्ट इंडिया कंपनीला लुटमारीच्या पहिल्या व्यापारात सुमारे 300 टक्के इतका प्रचंड नफा झाला होता.

अशा प्रकारे कंपनीचा भारतातील दबदबा वाढला

भारतात सर थॉमस रो यांनी मुघल सम्राटाकडून ईस्ट इंडिया कंपनीसाठी व्यापार करण्याचे अधिकार मिळवले. कंपनीने कलकत्ता (आता कोलकाता) येथून भारतात व्यवसाय सुरू केला आणि नंतर चेन्नई-मुंबई हे देखील तिचे मुख्य व्यवसाय केंद्र बनले. भारतात ईस्ट इंडिया कंपनीला प्रथम फ्रेंच कंपनी ‘डेस इंडेस’शी स्पर्धा करावी लागली. 1764 मध्ये बक्सरची लढाई कंपनीसाठी निर्णायक ठरली. यानंतर कंपनीने हळूहळू संपूर्ण भारतावर अधिकार प्रस्थापित केला. 1857 च्या उठावानंतर ब्रिटिश साम्राज्याने कंपनीच्या हातून भारताची सत्ता हिसकावून स्वतःच्या हातात घेतली. आता ते जगातील सर्वात श्रीमंत कंपन्यांच्या गणनेत कोठेही नाहीत. भारतीय वंशाच्या संजीव मेहता यांनी 2010 मध्ये 15 मिलियन डॉलर म्हणजेच 120 कोटी रुपयांना ती विकत घेतली होती.


हेही वाचाः मंत्रालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण; अनेक योजनांच्या घोषणा