घरदेश-विदेश१५ ऑगस्ट आधीच देश हादरविण्याचा रचलेला कट एसटीएफच्या पथकाने हाणून पडला

१५ ऑगस्ट आधीच देश हादरविण्याचा रचलेला कट एसटीएफच्या पथकाने हाणून पडला

Subscribe

१५ ऑगस्टच्या आधीच देशाला हादरवुन टाकणारी घटना घातल्याचं वृत्त समोर आलं आहे. एसटीएफ(STF) अंबालाच्या पथकाने सुमारे दीड किलो आरडीएक्स जप्त केले आहे. त्याचबरोबर एसटीएफच्या पथकाकडून टायमर आणि डिटोनेटरही जप्त करण्यात आले आहेत.

येत्या १५ ऑगस्टला(15 august) भारताला(india) स्वातंत्र्य  मिळून ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. याच पार्श्वभूमीवर ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ आणि ‘हर घर तिरंगा’ अभियान राबविण्यात येणार आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी(pm narendra modi) यांनी सुद्धा १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान घराघरात ध्वज फडकविण्यात यावा असं आवाहनंही केलं होतं. मात्र १५ ऑगस्टच्या आधीच देशाला हादरवुन टाकणारी घटना घातल्याचं वृत्त समोर आलं आहे.

हे ही वाचा – सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ५ टक्क्यांची वाढ, सरकारची मोठी घोषणा

- Advertisement -

एसटीएफ(STF) अंबालाच्या पथकाने सुमारे दीड किलो आरडीएक्स जप्त केले आहे. त्याचबरोबर एसटीएफच्या पथकाकडून टायमर आणि डिटोनेटरही जप्त करण्यात आले आहेत. धार्मिक स्थळ अशी ओळख असेलले कुरुक्षेत्र हादरवुन टाकण्याचा करण्यात आलेला प्रयत्न एसटीएफच्या पथकाने हणून पडला आहे. कुरुक्षेत्रच्या शाहबाद (shaahabad) भागातील जीटी रोड येथे असलेल्या मिरची ढाब्याजवळ ही स्फोटके सापडली आहेत. दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी आरोपी समशेर सिंगला अटक केली आहे. दरम्यान १५ ऑगस्ट च्या आधी देशातील काही महत्वाच्या ठिकाणी घातपात होण्याची शक्यता पोलिसांच्या गुप्तचर विभागाने आधीच वर्तवली होती.

हे ही वाचा – ‘हर घर तिरंगा’ अभियानाचं नवं गाणं; आशा भोसले, सोनू निगम, अमिताभ बच्चन यांचा स्वरसाज

- Advertisement -

दरम्यान या संदर्भांत हाती आलेल्या माहितीनुसार,. ही स्फोटके त्याठिकाणी कोणी ठेवली, ती कोणत्या उद्देशाने ठेवण्यात आलेली, या यामागे आणखी कोणत्या मोठया कटाचा डाव होता का ? आणि ही स्फोटके त्याठिकाणी नेमकी आली कुठून असे प्रश्न आत उपस्थित होत आहेत. याच प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी तपस सुरु सुरु काण्यात आला आहे. या प्रकरणातील आरोपी समशेर सिंगला उद्या न्यायालयात हजर करून आरोपीची चौकशी कारण्यासाठी कोठडी मागून घेण्यात येणार आहे. आरोपी समशेर सिंग विरोधात शहाबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे ही वाचा – दाऊदचा हस्तक सलीम फ्रुटला अटक, एनआयएची मोठी कारवाई

तर सुसरीकडे आरडीएक्स जपत केल्या नंतर बॉम्ब निकामी करणाऱ्या पथकाच्या तांत्रिक पथकाने काही काळासाठी राष्ट्रीय महामार्ग बंद करून ही विध्वंसक स्फोटके निकामी केली. यामध्ये आरडीएक्स दीड किलो आहे असे सांगण्यात आले होते. मात्र ते नेमके किती प्रमाणात होते याबाबाद अद्याप पोलिसांकडून कोनतीही ठोस माहिती समोर आलेली नाही.

याच संदर्भात एसपी कर्ण गोयल म्हणाले, दहशतवाद्यांसह आरडीएक्स जप्त करणे हे एसटीएफच्या पथकाचे मोठे यश आहे. याघटनेमागील त्यांचा चुकीचा हेतू जाणून घेण्यासाठी आरोपीला ताब्यात घेतले असून त्याची कसून चौकशी करण्यात येणार आहे. शहाबादमध्ये आरडीएक्स कसं पोहोचलं, त्याच बरोबर आरोपी तरुण कोणत्या दहशतवाद्यांशी संबंधित आहेत का? हे तपास पूर्ण झाल्यावर समोर येईल.

हे ही वाचा – चीनने डागली 11 डोंगफेंग क्षेपणास्त्रे, जपानमध्ये पडल्याने दोन्ही देशांमधील तणावाचे वातावरण

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -