घरदेश-विदेश‘कोरोना पॉझिटिव्ह’ रिपोर्ट अ‍ॅडमिटसाठी सक्तीचा नाही!

‘कोरोना पॉझिटिव्ह’ रिपोर्ट अ‍ॅडमिटसाठी सक्तीचा नाही!

Subscribe

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोरोना रुग्णांना रुग्णालयात भरती करण्याच्या नियमांमध्ये बदल केले आहेत. या नव्या नियमानुसार रुग्णालयात भरती होण्यासाठी आता कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा रिपोर्ट दाखवण्याची गरज नाही. संशयित व्यक्तीलाही रुग्णालयात भरती करता येणार आहे. तसेच कोरोनाच्या प्रत्येक व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्याची गरज नाही. रुग्णांच्या लक्षणांनुसार त्याला वॉर्ड सीसीसी, डीसीएससी आणि डीएससीमध्ये भरती करण्यात येणार आहे.

नव्या नियमांनुसार रुग्ण कोणत्याही शहरात राहणारा असला तरी कोणत्याही रुग्णाला कोणत्याही कारणाने सेवा देण्यास नकार देता येणार नाही. यात ऑक्सिजन आणि आवश्यक औषधांचाही समावेश आहे. कोणत्याही रुग्णाला कोणत्याही रुग्णालयात केवळ वैध ओळखपत्र नाही म्हणून प्रवेश नाकारता येणार नाही. आवश्यकतेनुसार त्याला रुग्णालयात प्रवेश दिला जाईल, असे नव्या नियमावलीत स्पष्ट नमूद करण्यात आले आहे.

- Advertisement -

काय आहेत नियम
रुग्णालयात दाखल होण्यासाठी कोरोना पॉझिटिव्ह असल्याच्या रिपोर्टची गरज नाही. संशयित व्यक्तीही रुग्णालयात अ‍ॅडमिट होऊ शकतो. कोणत्याही शहरातील कोणत्याही रुग्णाला ओळखपत्र नाही म्हणून रुग्णालयात अ‍ॅडमिट करण्यापासून रोखता येणार नाही. कोणत्याही रुग्णाला ऑक्सिजन आणि औषधे देण्यापासून वंचित ठेवता येणार नाही, मग तो कुठल्याही शहरात राहणारा असो.रुग्णाची लक्षणे आणि गरज पाहूनच रुग्णालयात दाखल केले जाईल.

रुग्णालयात अ‍ॅडमिट करण्याची गरज नसतानाही रुग्णांनी बेड अडवून ठेवले तर नाही ना, हे पाहणं बंधनकारक आहे. येत्या तीन दिवसात सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या आरोग्य विभागाने याची अंमलबजावणी करण्याचे निर्देशही आरोग्य विभागाने दिले आहेत.

- Advertisement -

रुग्णालयात भरती होण्याचे नवे नियम जाहीर
-संशयित व्यक्तीलाही अ‍ॅडमिट करणे बंधनकारक,
-हॉस्पिटलने कोणत्याही पेशन्टला ऑक्सिजन
औषधे देण्यापासून वंचित ठेवता येणार नाही,
-कोणत्याही पेशन्टला ओळखपत्र नाही म्हणून
हॉस्पिटलात अ‍ॅडमिट करण्यासाठी रोखता येणार
नाही, मग तो कुठल्याही शहरातील राहणारा असो,
-लक्षणे पाहूनच हॉस्पिटलमध्ये दाखल केले जाईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -