Eco friendly bappa Competition
घर देश-विदेश २७ वा वाढदिवस साजरा करण्यापूर्वीच देशातील सर्वात वयस्कर 'राजा' वाघाचा मृत्यू

२७ वा वाढदिवस साजरा करण्यापूर्वीच देशातील सर्वात वयस्कर ‘राजा’ वाघाचा मृत्यू

Subscribe

सोमवारी पहाटे ३ वाजल्याच्या सुमारास 'राजा' या वाघाचा मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आले. वन विभागातील अधिकाऱ्यांनी संगितले की 'राजा' हा देशातील सर्वात जास्त वर्षे जगणारा वाघ होता.

देशातील सर्वात वयस्कर ‘राजा’ या वाघाचा २७ वा वाढदिवस साजरा केला जाणार होता आणि त्यासाठी आवश्यक ती सर्व तयारी वन विभागाकडून करण्यात सुद्धा आली होती. पण त्या आधीच ‘राजा’ या वाघाचा वाढदिवस साजरा होण्यापूर्वीच सोमवारी पहाटे ३ वाजल्याच्या सुमारास ‘राजा'(raja) या वाघाचा मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आले. वन विभागातील अधिकाऱ्यांनी संगितले की ‘राजा’ हा देशातील सर्वात जास्त वर्षे जगणारा वाघ होता.

हे ही वाचा – फरार उद्योगपती विजय माल्ल्याला सर्वोच्च न्यायालयाचा झटका, ‘या’ प्रकरणात 4 महिने तुरुंगवास

- Advertisement -

पश्चिम बंगाल मधील देशातील सर्वाधिक वयस्कर वाघाचा मृत्यू झाला. या संदर्भातील माहिती एस के बी रेस्क्यू सेंटर मधील अधिकाऱ्यांनी दिली, त्यांच्यामते ‘राजा’ नावाच्या या वाघाला पश्चिम बंगाल(west bengal) मधील अलीपुरद्वार इथल्या टायगर पुनर्वसन केंद्रात ठेवण्यात आले होते. हाती आलेल्या माहिती नुसार २३ ऑगस्ट ला ‘राजा’ या वाघाचा २७ वा वाढदिवस वाढदिवस सुद्धा साजरा करण्यात येणार होता. तशी तयारी सुद्धा वन विभागाकडून करण्यात आली होती. पण त्या पूर्वीच सोमवारी पहाटे ३ च्या सुमारास ‘राजा’ या वाघाचा मृत्यू झाला.

हे ही वाचा – मेधा पाटकर यांच्यासह ११ जणांविरोधात गुन्हा दाखल, निधीचा गैरवापर केल्याचा आरोप

- Advertisement -

वन विभागाने दिलेल्या माहितीनुसार ‘राजा’ हा वाघ देशातील सर्वात वयस्कर वाघ होता. जास्त वय झाल्याने ‘राजा’ वाघ गेले काही दिवस व्यवस्थित जेवण करत नव्हता त्यामुळे त्याला अशक्तपणा आला होता. ‘राजा’ वाघाच्या मृत्यू नंतर एस के बी रेस्क्यू सेंटर मधील अधिकाऱ्यांनी आणि आणखी काही लोकांनी ‘राजा’ ला श्रद्धांजली वाहिली. ‘राजा’ या वाघाला २००६ सालात जखमी अवस्थेत असताना सुंदरबन येथून पश्चिम बंगाल येथे आणले होते. त्या नंतर एस के बी रेस्क्यू सेंटर मध्ये ‘राजा’ या वाघावर उपचार करण्यात आले.

हे ही वाचा – दही-लस्सीसह स्टेशनरी वस्तूंवरील जीएसटी वाढणार, महागणाऱ्या वस्तूंची यादी पाहा

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -