नवी दिल्ली : मणिपूर हिंसाचारावर संसदेत केंद्र सरकारविरोधात विरोधकांनी आणलेल्या अविश्वास प्रस्तावाला उत्तर देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलताना त्यांनी कॉंग्रेसवर निशाणा साधला. ज्यांनी अविश्वास प्रस्ताव आणला. त्याच कॉंग्रेसवर देशातील नागरिकांचा अविश्वासाचा खूप मोठा इतिहास आहे. यावेळी त्यांनी कॉंग्रेसची सत्ता नसलेल्या राज्यांचा इतिहासच सभागृहात वाचून कॉंग्रेसवर निशाणा साधला.
यावेळी उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, काँग्रेस आपल्या अभिमानाने एवढी पोखरली गेली आहे की, तिला जमीनही दिसत नाही. 61 वर्षांपासून तामिळनाडूतील जनता काँग्रेसवर अविश्वास असल्याचे सांगत आहे. 1972 मध्ये त्यांना पश्चिम बंगालमध्ये शेवटची संधी मिळाली होती, ते 51 वर्षांपासून काँग्रेसवर अविश्वास असल्याचे सांगत आहेत. उत्तर प्रदेश, गुजरातमधील जनता 38 वर्षांपासून काँग्रेसला सांगत आहेत. तर त्रिपुरातील जनता 35 वर्षांपासून हेच सांगत आहे. 1995 मध्ये ओडिशात काँग्रेस शेवटच्या वेळी जिंकली होती, म्हणजे 28 वर्षांपासून काँग्रेसला एकच उत्तर मिळत आहे ते म्हणजे काँग्रेसवर अविश्वास आहे. सोबतच नागालँडचे लोकही 25 वर्षांपासून हेच सांगत आहेत. जनतेने काँग्रेसवर अविश्वास असल्याचे वारंवार जाहीर केले आहे असे म्हणत मोदी यांनी कॉंग्रेसची सत्ता नसलेल्या राज्यांचा सभागृहात पाढाच वाचला.
हेही वाचा : विरोधकांकडे सिक्रेट वरदान आहे, ते ज्यांचं वाईट इच्छितात त्यांचे भले होते; मोदींचा कॉंग्रेसवर हल्लाबोल
देशाच्या सामर्थ्यांवर विरोधकांना विश्वास नाही
यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, विरोधकांचा भारताच्या क्षमतेवर विश्वास नाही. त्यांचा भारतातील लोकांवर विश्वास नाही. त्यामुळेच देशातील जनतेचा काँग्रेसवरचा अविश्वास खूप खोलवर आहे. पुढे बोलताना त्यांनी भारताने दहशतवादावर सर्जिकल स्ट्राईक केले, एअर स्ट्राईक केले. मात्र तरीही विरोधकांचा भारतीय सैन्यावर विश्वास नव्हता, त्यांनी शत्रूच्या दाव्यांवर विश्वास ठेवला होता.
हेही वाचा : PM Narendra Modi : शतकात अनेक संधी, या काळाचा प्रभाव हजारो वर्षांपर्यंत राहील – मोदी
इंडिया गटावर साधला निशाणा
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, विरोधी पक्षातील सहकार्यांबद्दल संवेदना व्यक्त करायच्या आहेत. कारण काही दिवसांपूर्वी बंगळुरूमध्ये त्यांनी जुन्या यूपीएवर अंत्यसंस्कार केले. असे करून विरोधक आनंदोत्सव साजरा करत होते. म्हणून मी शोक व्यक्त केला नाही असे म्हणत नुकत्याच बंगळुरूमधील विरोधकांच्या इंडिया गटाला टोला मारला.