बलात्कार प्रकरणात सरणावर गेलेल्या शिक्षकाला कोर्टाने पाठवले कारागृहात, नेमकं प्रकरण वाचा!

Bhagalpur Crime | विशेष न्यायाधीश लवकुश कुमार यांच्या खंडपीठासमोर आज याप्रकरणी सुनावणी झाली. या सुनावणीत आरोपीला १४ वर्षांची शिक्षा आणि एक लाखांचा दंड ठोठावण्यात आला. एवढंच नव्हे तर, पीडित विद्यार्थीनीला नुकसानभरपाई म्हणून तीन लाख रुपये देण्याचेही आदेश देण्यात आले.

clashesh between shinde group and bjp leader in kedgaon ahmednagar

Bhagalpur Crime | भागलपूर – विद्यार्थीनीच्या बलात्कारप्रकरणी कायदेशीर कारवाईपासून वाचण्याकरता एका शिक्षकाने स्वतःचंच सरण रचल्याची घटना समोर आली आहे. धक्कादायक म्हणजे, संबंधित शिक्षकाच्या वडिलांनीही यात मदत केली आहे. दरम्यान, या बोगस मृत्यूप्रकरणाचा खुलासा होताच न्यायालायने त्याला १४ वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

हेही वाचा –त्या’ दृष्यांवरून केंद्र सरकारकडून वृत्तवाहिन्यांना चपराक; महिला-बालकांवर होतोय विपरित परिणाम

बिहारमधील भागलपूर शहरातील इशीपूर बाराहाट पोलीस ठाणे क्षेत्रातील ही घटना आहे. १४ ऑक्टोबर २०१८ मध्ये नीरज मोदी नामक शिक्षकाने विद्यार्थीवर बलात्कार केला असल्याची तक्रार पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. या प्रकरणातून सही सलामत सुटण्याकरता आरोपीने स्वतःच्या मृत्यूची कथा रचली. यासाठी त्याच्या वडिलांनीही त्याला मदत केली. एवढंच नव्हे तर, मृतदेह उचलण्यापासून ते जाळण्यापर्यंत लागणाऱ्या सर्व साहित्याची बिलेही त्यांनी न्यायालयासमोर सादर केली.

अत्याचारप्रकरणात मुलाला शिक्षा होऊ नये याकरता आरोपी आणि त्याच्या वडिलांनी मिळून प्लान बनवला. यासाठी आरोपीने स्वतःच्या मृत्यूची कहाणी रचली. आपला मुलगा खरंच निधन पावला आहे हे भासवण्याकरता त्याच्या वडिलांनी सरण रचले, त्या सरणावर मुलाला चढवले, एवढंच नव्हे तर सरणावरील मृतदेहाला मुखाग्नीही दिला असल्याचं भासवण्यात आलं. या सर्व कथित अंत्यस्काराचे त्याच्या मित्राने फोटोही काढले. हे फोटो विशेष न्यायालयात सादर करण्यात आले. मुखाग्नीचा फोटो सादर झाल्यानंतर संबंधित आरोपी भूमिगत झाला.

हेही वाचा – मद्यधुंद अवस्थेत तरुणांनी विमानात घातला गोंधळ, एअर होस्टेसशी गैरवर्तन

न्यायालय फक्त फोटो, साहित्यांच्या बिलांवर निर्णय देत नाही. न्यायालयाला कायदेशीर पुरावा लागतो. म्हणून, लाकडाच्या खरेदीचे बिल दाखवून त्यांनी मुलाच्या मृत्यूचे प्रमाणपत्रही बनवून घेतले. हे प्रमाणपत्र त्यांनी कोर्टात सादर केले. शपथपत्रासह मृत्यूप्रमाणपत्र न्यायालयात सादर झाल्यानंतर या प्रकरणाची फाईल बंद करण्यात आली होती.

पण आरोपी फारवेळ शिक्षेपासून दूर राहू शकत नाही. पीडितेच्या आईला या कथित मृत्यूप्रकरणाची माहिती मिळाली. तिने स्वतः या कथित मृत्यूचा भांडाफोड केला. पीडितेच्या आईने प्रखंड विकास पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यांना एक अर्ज सादर केला. संबंधित आरोपीने खोटे मृत्यूप्रमाणपत्र सादर करण्यात आले असून याची चौकशी व्हावी अशी मागणी अर्जाद्वारे करण्यात आली. महिलेने केलेल्या विनंती अर्जावरून चौकशी सुरू करण्यात आली. चौकशीला सुरुवात होताच आरोपीचे षडयंत्र समोर आले.

चौकशीदरम्यान मृत्यूची नोंदणी करणारे रजिस्ट्रार धर्मेंद्र कुमार यांना नीरज मोदी यांच्याविरोधात तक्रार दाखल कऱण्याची मागणी केली गेली. खोटी माहिती देऊन मृत्यूप्रमाणपत्र बनवल्याप्रकरणी तक्रार दाखल करण्याची शिफारस करण्यात आली धर्मेंद्र कुमार यांच्याकडे करण्यात आली. त्यानुसार, २१ मे २०२२ मध्ये पीरपैंती बीडीओ यांनी दिलेल्या निर्देशानुसार २४ तासांच्या आत आरोपी नीरज मोदी याचे वडील राजाराम मोदी यांच्यावर फसवणूक केल्याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली.

हेही वाचा सेंट्रल सेनेगलमध्ये दोन बसचा भीषण अपघात; सुमारे 40 जणांचा मृत्यू, 78 जखमी

विशेष न्यायाधीश लवकुश कुमार यांच्या खंडपीठासमोर आज याप्रकरणी सुनावणी झाली. या सुनावणीत आरोपीला १४ वर्षांची शिक्षा आणि एक लाखांचा दंड ठोठावण्यात आला. एवढंच नव्हे तर, पीडित विद्यार्थीनीला नुकसानभरपाई म्हणून तीन लाख रुपये देण्याचेही आदेश देण्यात आले.