घरदेश-विदेशभारतीय संस्कृती आणि संगीताचे वेड जगभरातच वाढले आहे, पंतप्रधान मोदींची 'मन की...

भारतीय संस्कृती आणि संगीताचे वेड जगभरातच वाढले आहे, पंतप्रधान मोदींची ‘मन की बात’

Subscribe

नवी दिल्ली : गेल्या 8 वर्षांमध्ये भारतातून संगीतवाद्यांची निर्यात तीन पटींनी वाढली आहे. विद्युत आधारित संगीत वाद्यांची निर्यात 60 पटींनी वाढली आहे. यावरून भारतीय संस्कृती आणि संगीत यांचे वेड जगभरातच वाढले आहे, हे लक्षात येईल. भारतीय संगीत वाद्यांचे सर्वात मोठे खरेदीदार अमेरिका, जर्मनी, फ्रान्स, जपान आणि युके यासारखे विकसित देश आहेत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

आपल्या ‘मन की बात’च्या 95व्या भागात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या संगीत, नृत्य आणि कलेच्या समृद्ध वारशाबद्दल सांगितले. तसेच त्यांनी महात्मा गांधी यांचे ‘वेष्णव जन तो…’ हे गाणे ऐकवले. कॉन्स्टँटिनोस कलाइत्झीस या ग्रीक गायकाने गांधीजींच्या 150व्या जयंती उत्सवाच्या वेळी हे गाणे गायले होते. त्यांना भारत आणि भारतीय संगीताची प्रचंड आवड आहे. गेल्या 42 वर्षांत ते जवळजवळ दरवर्षी भारतात आले आहेत. भारतीय संगीताचे मूळ, विविध भारतीय संगीत, विविध प्रकारचे राग, ताल आणि रस तसेच विविध घराण्यांचा देखील त्यांनी अभ्यास केला आहे. भारतीय संगीत क्षेत्रातील अनेक महान व्यक्तींच्या योगदानाचा देखील त्यांनी अभ्यास केला आहे, भारतातील शास्त्रीय नृत्यांचे विविध पैलू देखील त्यांनी बारकाईने समजून घेतले आहेत. भारताशी संबंधित या सर्व अनुभवांना त्यांनी आता एका पुस्तकात अतिशय सुंदरपणे गुंफले आहे. इंडियन म्युझिक नावाच्या त्यांच्या पुस्तकात सुमारे 760 छायाचित्रे आहेत, अशी माहिती पंतप्रधानांनी दिली.

- Advertisement -

कला, संगीत आणि साहित्याप्रति असलेली आमची आवड ही मानवतेची खरी ओळख आहे. वास्तवात, आमची संस्कृती याला मानवतेच्याही वर अध्यात्मिकतेकडे घेऊन जाते. वेदांमध्ये सामवेदाला तर आमच्या विविध प्रकारच्या संगीतांचा स्रोत म्हटले आहे. माता सरस्वतीच्या हातातीतल वीणा असो, भगवान श्रीकृष्णाच्या हातातील बासरी असो किंवा भोलनाथ यांच्या हातातील डमरू असो, आमच्या देवीदेवताही संगीतापासून विभक्त नाहीत, असे ते म्हणाले.

आपल्या संस्कृतीमध्ये संगीत सर्वत्र भरून राहिले आहे. हे संगीत केवळ शरीराला सुखद जाणीव देत नाही तर, मनालाही उल्हसित करते. संगीत आमच्या समाजाला जोडतही असते. भांगडा आणि लावणीमध्ये आनंदाची भावना आहे, तर रवींद्र संगीत आमच्या आत्म्याला आल्हाद देते. देशभरातील आदिवासींची वेगवेगळ्या प्रकारांची संगीत परंपरा आहे. ती आम्हाला सगळ्यांशी मिळून मिसळून रहाण्यासाठी आणि निसर्गासह राहाण्याची प्रेरणा देत असते. संगीताच्या वेगवेगळ्या शैलीने केवळ आमच्या संस्कृतीला समृद्ध केले आहे, असे नाही तर जगभरातील संगीतावर आपला कधीही न मिटणारा ठसा उमटवला आहे, असेही पंतप्रधानांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -