घरदेश-विदेशभाजप नेता मुस्लिम मुलाशी लावून देणार स्वतःच्या मुलीचे लग्न; जाणून घ्या काय आहे प्रकरण

भाजप नेता मुस्लिम मुलाशी लावून देणार स्वतःच्या मुलीचे लग्न; जाणून घ्या काय आहे प्रकरण

Subscribe

नवी दिल्ली : उत्तराखंडमधील भाजपा नेते यशपाल बेनम यांच्या मुलीचे मुस्लीम तरुणासोबत लग्न होणार आहे. या प्रकरणी अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. त्याच्या पक्षातील काही नेत्यांनीही यावर चर्चा केली असल्यामुळे यशपाल बेनम यांनी आपल्याच पक्षातील सदस्यांना चांगलेच सुनावले आहे. त्यांनी म्हटले की, कोणीही विसरू नये की, सध्या 21 वे शतक सुरू आहे आणि आपल्या मुलांना स्वत:चे निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार आहे.  (The daughter of BJP leaders will marry Muslim boy)

यशपाल बेनम (Yashpal Bennam) हे उत्तराखंडमधील पौरी गढवाल नगरपालिकेचे अध्यक्ष आहेत. त्यांची मुलगी मोनिकाचे लग्न येत्या 28 मे रोजी उत्तर प्रदेशातील अमेठी येथील पुरेबाज गावातील मोहम्मद मोनीसशी होणार आहे. बेनम यांची मुलगी मोनिकाने लखनऊ विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केले आहे. याचवेळी तिची भेट अमेठीच्या मोनिसशी झाली. दोघांनाही प्रेम झाले आणि दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि दोघांच्याही परिवारानेही या लग्नाला सहमती दर्शवली. यशपाल बेनम यांच्या पत्नी उषा रावत या लग्नाची पत्रिका पाहुण्यांना देत आहेत. ही लग्नाची पत्रिका सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. भाजपा नेता आपल्या मुलीचे मुस्लीम तरुणासोबत लग्न लावत असल्यामुळे त्यांच्या पक्षातील अनेक नेते प्रश्न उपस्थित करत आहेत.

- Advertisement -

बेनम यांनी आपल्याच पक्षातील सदस्यांना सुनावले
मुलीच्या लग्नावर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना यशपाल बेनम यांनी चांगलेच सुनावले आहे. बेनम म्हणाले की, माझ्या मुलीच्या लग्नाला कोणीही विरोध करू नये. जे धर्माच्या नजरेतून या लग्नाला पाहत आहेत त्यांना मी सांगू इच्छितो की, दोन्ही कुटुंबांसाठी आनंदाचा क्षण आहे. त्यामुळे माझ्यासाठी धर्म फारसा महत्त्वाचा नाही, पण हा विवाह हिंदू परंपरेनुसार होईल, असेही मी सांगू इच्छितो.

असे लग्न स्वीकारू शकत नाही
पौरीच्या गोसेवा आयोगाचे सदस्य धर्मवीर गुसैन म्हणाले की, “आजही उत्तराखंडमध्ये छोटी धोती (लहान ब्राह्मण) आणि बडी धोतीला (मोठे ब्राह्मण) खूप महत्त्व आहे. अशा विवाहाला सामाजिक मान्यता देण्यासाठी हा प्रकार अशोभनीय व निषेधार्ह आहे. त्यामुळे आम्ही असे लग्न स्वीकारू शकत नाही.

- Advertisement -

यशपाल बेनम यांच्याविषयी
यशपाल बेनम आधी काँग्रेसमध्ये होते. २००३ मध्ये पहिल्यांदाच ते पौरी नगरपालिकेचे अध्यक्ष झाले. 2007 मध्ये काँग्रेसकडून तिकीट न मिळाल्याने त्यांनी पौरीमधून अपक्ष उमेदवारी जाहीर करताना आमदार झाले. 2013 मध्ये ते पुन्हा नगराध्यक्ष झाले आणि सध्या ते भाजपचे नेते म्हणून तिसऱ्यांदा नगराध्यक्ष म्हणून पौरीमध्ये काम पाहत आहेत.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -