घरदेश-विदेशतंत्रमंत्र करताना एकाचा मृत्यू, त्याला जिवंत करण्यासाठी दुसऱ्याची साधना

तंत्रमंत्र करताना एकाचा मृत्यू, त्याला जिवंत करण्यासाठी दुसऱ्याची साधना

Subscribe

उत्तर प्रदेशमध्ये तंत्र विद्या करताना एकाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. दोन भाऊ तंत्र विद्या करत होते. यामध्ये एका भावाचा मृत्यू झाला. यानंतर दुसऱ्या भावाने आपल्या भावाला जिवंत ठेवण्यासाठी अनेक दिवस घरात त्याचा मृतदेह ठेवत तंत्र विद्या करत होता. मात्र, ग्रामस्थांना त्याच्यावर संशय आल्यानंतर पोलिसांना कळवले. त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी घरातून मृतदेह ताब्यात घेतला आणि भावाला ताब्यात घेतले. उर्वरित कुटुंबाची चौकशी सुरू आहे. याबाबतचे वृत्त आज तकने दिले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना लखनऊच्या इटोंजा पोलीस स्टेशन परिसरातील उसरणा गावची आहे. बृजेश रावत हे त्यांची पत्नी आणि ३ मुलांसमवेत राहत होते. भाऊ आणि आईसुद्धा घरात त्याच्याबरोबर राहत असत. कुटुंबाच्या म्हणण्यानुसार ब्रिजेश रावत आणि त्याचा भाऊ फूलचंद यांनी शिवलिंग प्राप्त करण्यासाठी खोलीत कुलूप लावून तंत्र विद्या सुरू केली. यानंतर ब्रिजेश रावतने नग्न करुन खोलीत तंत्र केले. या दरम्यान त्याचा मृत्यू झाला. मृत्यूनंतर फूलचंद ने आपल्या भावाला जिवंत करण्यासाठी तंत्र विद्या सुरू केली. जर कोणी तंत्रज्ञानाला अडथळा आणला तर त्याचा नाश होईल, अशी कुटुंबातील सदस्यांना धमकी दिली. त्यानंतर त्याने आपल्या भावाच्या मृतदेहासह एका खोलीत तंत्र करत राहिला.

- Advertisement -

शेजार्‍यांनी मृतक बृजेश रावत याची चौकशी केली असता ही माहिती उघडकीस आली पण काहीच प्रतिसाद न मिळाल्याने आणि दरवाजा उघडला नाही, यामुळे याबाबतची माहिती त्यांनी पोलिसांना दिली. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी बराच वेळ दार ठोठावले पण काहीच प्रतिसाद मिळाला नाही. यानंतर घराचा दरवाजा तोडला आणि मृत ब्रिजेशचा मृतदेह घरातच पडला होता आणि त्याचा भाऊ फूलचंद त्याच्या शेजारी तंत्र ध्यान करीत असल्याचे आढळून आले. मृतदेहाचा खूप वास येत होता, ज्यामुळे त्याचे पोस्टमॉर्टम करणे देखील कठीण झाले. एसपी आदित्य लेहंगा यांच्या म्हणण्यानुसार, दोन्ही भाऊ तंत्र विद्या करीत होते, त्यानंतर ब्रिजेशचा मृत्यू झाला. मृत्यूचे कारण छळ असल्याचे मानले जात आहे.


हेही वाचा – परवडणारी घरे होणार आणखी स्वस्त; राज्य सरकार घेणार मोठा निर्णय

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -