घरCORONA UPDATECoronavirus: कोरोनाचा कहर; जगात मृतांचा आकडा ७४ हजार पार

Coronavirus: कोरोनाचा कहर; जगात मृतांचा आकडा ७४ हजार पार

Subscribe

जगभरात मृतांचा आकडा सतत वाढत आहे. जगात कोरोना विषाणूमुळे ७४,००० हून अधिक लोक मरण पावले आहेत. अमेरिकेत मृतांची संख्या १० हजारांच्या पुढे गेली आहे. इटलीमध्ये आतापर्यंत मृत्यूची सर्वाधिक नोंद झाली असून ही संख्या १६,००० च्या वर गेली आहे.

चीनच्या वुहानपासून सुरू झालेल्या कोरोनाने संपूर्ण जगाला वेढलं आहे. कोरोनामुळे जगातील सर्वच देशांमध्ये जनजीवन थाबलं आहे. सर्वच देशांमध्ये लॉकडाऊन लागू केलं आहे. कोरोनावर अद्याप कोणतीच लस आलेली नाही. त्यामुळे कोरोनावर विजय मिळवण्यात मानवाला अद्याप यश आलेलं नाही. वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार जगभरात एकूण १३ लाख ४९ हजार ६६५ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर ७४ हजार ८१६ लोकांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेत सोमवारी कोरोनामुळे १,२५५ लोकांचा बळी गेला आहे. युरोपमध्ये कोरोनाने थैमान घातलं आहे. युरोपमधील ११ देश कोरोनामुळे असुरक्षित आहेत.

अमेरिकेत ३ लाखाहून अधिक लोकांना कोरोनाचा संसर्ग

अमेरिकेत मृतांचा आकडा सतत वाढत आहे. अमेरिकेत आतापर्यंत ३ लाख ६७ हजार ६५० लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. सोमवारी ३० हजार ३३१ नवे रुग्ण आढळले आहेत. तर कोरोनामुळे १ हजार २५५ लोकांचा मृत्यू झाला. यामुळे मृतांंचा आकडा वाढला आहे. १० हजार ९४३ जणांचा मृत्यू झाला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – कोरोनाचा प्रसार करण्यात WHO पण जबाबदार; महासंचालकांनी राजीनामा द्यावा, अमेरिकेची मागणी


इटलीमध्ये मृतांचा आकडा १६ हजार पार

जगात कोरोना विषाणूंमुळे सर्वात जास्त मृत्यू इटलीमध्ये झाले आहेत. इटलीमध्ये मृतांची संख्या दररोज वाढत आहे. वर्ल्डमीटरच्या आकडेवारीनुसार इटलीमध्ये सोमवारी ६३६ लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोना विषाणूमुळे इटलीमध्ये मृतांचा आकडा १६ हजार ५२३ वर पोहोचला आहे. इटलीमध्ये १ लाख ३२ हजार ५४७ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर २२ हजार ८३७ जण बरे झाले आहेत.

- Advertisement -

स्पेनमध्ये एका दिवसात ७०० लोकांचा मृत्यू

युरोपियन देश स्पेनमध्ये कोरोना संसर्ग खूप वेगाने वाढला आहे. स्पेनमधील मृतांचा आकडा १३ हजार ३४१ वर पोहोचला आहे. सोमवारी स्पेनमध्ये ७०० लोकांचा मृत्यू झाला आहे. तर ५ हजार २९ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे कोरोनाग्रस्तांचा आकडा १ लाख ३६ हजार ६७५ वर पोहोचला आहे.

कोणत्या देशात किती मृत्यू

इटली – १६,५२३

स्पेन – १३,३४१

अमेरिका – १०,९४३

फ्रान्स – ८,९११

यूके – ५,३७३

इराण – ३,७३९

चीन – ३,३३१

नेदरलँड्स – १,८६७

जर्मनी – १,८१०

बेल्जियम – १,६३२

स्वित्झर्लंड – ७६९

तुर्की – ६४९

ब्राझील – ५६६

स्वीडन – ४७७


हेही वाचा – न्यूझीलंडच्या आरोग्यमंत्र्यांनी केलं लॉकडाऊनचं उल्लंघन; पंतप्रधानांनी केली कारवाई


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -