घरदेश-विदेशइंग्रजांना भारतातील 'या' मंदिरावरुन सुचली संसद भवनाची रचना; जाणून घ्या इतिहास

इंग्रजांना भारतातील ‘या’ मंदिरावरुन सुचली संसद भवनाची रचना; जाणून घ्या इतिहास

Subscribe

असं म्हटलं जात की, ब्रिटीश वास्तुविशारद एडविन लुटियन्सने भारतीय संसदेची उभारणी मुरैना येथील चौसष्ट योगिनी मंदिराच्या आधारे केली होती. पण ही गोष्ट ना कुठल्यात लिहिलेली आहे ना संसदेच्या संकेतस्थळावर अशी कोणतीही माहिती देण्यात आली आहे.

भारताच्या नव्या संसद भवनाचं 28 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. या उद्घाटनावरुन सध्या वाद निर्माण झाला आहे. विरोधकांनी या उद्घाटन सोहळ्यावर बहिष्कार घातला आहे. त्यामुळे देशाचं नवीन संसद भवन चर्चेत आलं आहे. तसचं जुनं संसद भवन हे 100 वर्ष जुनं आहे. मागच्या 75 वर्षांपासून देशाचा कारभार हा या जुन्या संसद भवनातून चालवला गेला होता. आता या जुन्या संसद भवनाचा इतिहास जाणून घेऊया. कारण हे लवकरच इतिहास जमा होईल आणि त्याचं रुपांतर एका म्युझिअममध्ये केलं जाणार आहे. या संसद भवनाची रचना ही भारतातील एका मंदिराची मंदिराच्या रचनेवरुन घेण्यात आली आहे. याविषयी सविस्तर जाणून घेऊया. ( The design of the Parliament House was suggested to the British from the Chausath Yogini temple at Morena in Madhya Pradesh India )

भारतातील मध्य प्रदेशात दोन पुरातन मंदिरे आहेत. पण मध्य प्रदेशातील मुरैना येथे असलेले चौसष्ट योगिनी मंदिर हे सर्वात प्राचीन आणि रहस्यमय आहे. भारतातील सर्व चौसष्ट योगिनी मंदिरांपैकी हे एकमेव मंदिर आहे जे अजूनही सुस्थितीत आहे. मुरैना येथे असलेले हे मंदिर तंत्र-मंत्रासाठी जगभर प्रसिद्ध होते. हे रहस्यमय मंदिर तांत्रिक विद्यापीठ म्हणूनही ओळखले जात असे. जगभरातून लाखो तांत्रिक तंत्र-मंत्राचे ज्ञान शिकण्यासाठी येथे येत असत. मरीना येथे असलेल्या प्राचीन आणि रहस्यमय चौसष्ट योगिनी मंदिराबद्दल जाणून घेऊया.

- Advertisement -

मध्य प्रदेशातील प्राचीन चौसष्ट योगिनी मंदिर गोलाकार असून त्यात ६४ खोल्या आहेत. या सर्व ६४ खोल्यांमध्ये भव्य शिवलिंग स्थापित केले आहे. हे मंदिर मुरैना जिल्हा मुख्यालयापासून सुमारे 30 किलोमीटर अंतरावर आहे. मितावली गावात बांधलेले हे रहस्यमय मंदिर जगभर प्रसिद्ध आहे.

हे अप्रतिम मंदिर सुमारे 100 फूट उंचीवर बांधण्यात आले असून टेकडीवर वसलेले हे गोलाकार मंदिर एखाद्या उडत्या तबकडीसारखे दिसते. या मंदिरात जाण्यासाठी 200 पायऱ्या चढाव्या लागतात. मंदिराच्या मध्यभागी एक मोकळा मंडप बांधण्यात आला आहे, ज्यामध्ये एक विशाल शिवलिंग स्थापित केले आहे. हे मंदिर 700 वर्षे जुने आहे.

- Advertisement -

चौसष्ट योगिनी मंदिराच्या प्रत्येक खोलीत शिवलिंग आणि योगिनी देवीची मूर्ती होती. त्यामुळे मंदिराचे नाव चौसष्ट योगिनी पडले. अनेक मूर्त्या चोरीला गेल्या आहेत. त्यामुळे आता उर्वरित मूर्त्या दिल्लीतील संग्रहालयात ठेवण्यात आल्या आहेत. 101 खांब असलेले हे मंदिर भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाने एक प्राचीन ऐतिहासिक वास्तू म्हणून घोषित केले आहे.

असं म्हटलं जात की, ब्रिटीश वास्तुविशारद एडविन लुटियन्सने भारतीय संसदेची उभारणी मुरैना येथील चौसष्ट योगिनी मंदिराच्या आधारे केली होती. पण ही गोष्ट ना कुठल्यात लिहिलेली आहे ना संसदेच्या संकेतस्थळावर अशी कोणतीही माहिती देण्यात आली आहे. भारतीय संसद केवळ या मंदिरासारखीच नाहीतर संसदेतील खांबही मंदिराच्या खांबासारखे दिसतात.

( हेही वाचा: नवीन संसदेच्या उद्घाटनानंतर जुने संसद भवन जमीनदोस्त होणार काय? )

आजही हे मंदिर भगवान शिवाच्या तंत्र साधनेच्या चिलखतीने झाकलेले आहे अशी स्थानिक लोकांची श्रद्धा आहे. या मंदिरात कोणालाही रात्री राहण्याची परवानगी नाही. तंत्र साधनेसाठी प्रसिद्ध चौसष्ट योगिनी मंदिरात भगवान शंकराच्या योगिनींना जागृत करण्याचे काम करण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -