घरताज्या घडामोडीमहापौरपदाच्या निवडणुकीवरून दिल्ली महापालिकेत पुन्हा राडा, सभागृहाचे कामकाज तहकूब

महापौरपदाच्या निवडणुकीवरून दिल्ली महापालिकेत पुन्हा राडा, सभागृहाचे कामकाज तहकूब

Subscribe

दिल्ली महानगरपालिकेत आम आदमी पक्ष आणि भाजपमध्ये सभागृहात मोठा गोंधळ झाल्याने 6 जानेवारीला महापौर पदाची निवडणूक झाली नव्हती. ती आज होत आहे. दिल्ली महानगरपालिका निवडणुकीत आपने पंधरा वर्षापासून सत्तेत असलेल्या भाजपचा पराभव केला. या निवडणुकीत आपला 134 तर भाजपला 104 जागा आणि कॉंग्रेसला 9 जागा मिळाल्या. दरम्यान, महापौरपदाच्या निवडणुकीवरून दिल्ली महापालिकेत पुन्हा एकदा राडा झाल्याचे पाहायला मिळाले. महापालिकेचे सभागृह काही अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आले आहे. त्यामुळे महापौरपदाची निवडणूक होऊ शकली नाही.

भाजप नगरसेवकांच्या सततच्या गदारोळामुळे सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात आले. दिल्ली महानगरपालिकेच्या सभागृहातून महापौर, उपमहापौर आणि स्थायी समितीच्या 6 सदस्यांच्या प्रतिष्ठेच्या पदांसाठी आज निवडणूक होती. दिल्ली महानगरपालिका निवडणुकीत निवडून आलेल्या सर्व 250 नगरसेवकांचा शपथविधी काही वेळापूर्वीच पूर्ण झाला. शपथविधीनंतर आम आदमी पक्षाचे नगरसेवक मुकेश गोयल म्हणाले की, जे मतदान करण्यास पात्र नाहीत त्यांना सभागृहाच्या बाहेर बसवण्यात यावे. मात्र सततच्या होणाऱ्या गदारोळामुळे सभागृहच तहकूब करण्यात आले.

- Advertisement -

सुरक्षा दल अलर्ट मोडवर

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर MCD मुख्यालयाच्या सिव्हिक सेंटरमध्ये सुरक्षा दल तैनात करण्यात आले होते. परंपरेनुसार, प्रोटेम स्पीकर सत्या शर्मा यांनी प्रथम नामनिर्देशित नगरसेवकांना शपथ देण्यास सुरुवात केली आणि यावरून गदारोळ सुरू झाला. त्यामुळे दिल्ली महानगरपालिकेचे सभागृह तहकूब करावे लागले. निवडून आलेले सर्व 250 नगरसेवक, दिल्लीचे 14 आमदार आणि 10 खासदार या निवडणुकीत मतदान करू शकणार आहेत.

- Advertisement -

शैली ओबराय या आपच्या महापौर पदाच्या उमेदवार आहेत. तर मोहम्मद इकबाल हे उपमहापौर पदाचे उमेदवार आहेत. तर रेखा गुप्ता या भाजपच्या महापौर पदाच्या उमेदवार असून त्या तिसऱ्यांदा महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आल्या आहेत. याशिवाय त्या भाजपच्या महिला मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षाही आहेत. दिल्लीच्या राज्यपालांनी महापौर पदाच्या निवडणुकीची सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सत्या शर्मा यांची पीठासीन अधिकारी म्हणून निवड केली आहे.

आज होणाऱ्या महापौर, उपमहापौर आणि स्थायी समिती सदस्यांच्या निवडणुकीत काँग्रेसने सहभागी न होण्याचा निर्णय घेतला होता. तर एमसीडीमध्ये काँग्रेसचे 9 नगरसेवक आहेत. एमसीडीची निवडणूक 4 डिसेंबरला झाली होती आणि 7 डिसेंबरला मतमोजणी झाली. आपने 134 वॉर्ड जिंकून MCD मध्ये भाजपची 15 वर्षांची सत्ता संपवली.


हेही वाचा : सर्जिकल स्ट्राइक : दिग्विजय सिंह यांच्याकडून सारवासारव तर, काँग्रेसचे कानावर हात


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -