Tuesday, June 6, 2023
27 C
Mumbai
घर देश-विदेश Budget 2023 : रेल्वेचे रुपडे पालटणार, १.९ लाख कोटींची तरतूद अपेक्षित

Budget 2023 : रेल्वेचे रुपडे पालटणार, १.९ लाख कोटींची तरतूद अपेक्षित

Subscribe

Provision for Railway in Budget 2023 : नवी दिल्ली – अर्थमंत्री निर्मला सीतारामन १ फेब्रुवारीला केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पाकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. या अर्थसंकल्पात भारतीय रेल्वेसाठी मोठ्या घोषणा करण्यात येण्याची शक्यता आहे. या अर्थसंकल्पात रेल्वेसाठी १.९ लाख कोटींची तरतूद केली जाते.

३५ हायड्रोजन-इंधन असलेल्या ट्रेन, ४००-५०० वंदे भारत ट्रेन, नवीन डिझाईन जवळपास ४ हजार ऑटोमोबाईल कॅरिअर कोच आणि ५८ हजार वॅगन्सचा समावेश करण्याची घोषणा केली जाऊ शकते, असं म्हटलं जात आहे. टाईम्स ऑफ इंडियाने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. १.९ लाख कोटींच्या निधीमधून रोलिंग स्टॉकचे आधुनिकीकरण, रेल्वे ट्रॅक सुधारणे आणि विद्युतीकरण, २०३० पर्यंत निव्वळ कार्बन उत्सर्जन करण्यात येणार असल्याची माहिती आहे.

- Advertisement -


येत्या तीन वर्षांत रोलिंग स्टॉक प्रोग्रॅम पूर्ण करण्यात येणार आहे. यासाठी २.७ लाख कोटींचा निधी मिळण्याची शक्यता आहे. हा निधी आतापर्यंतच्या अर्थसंकल्पातील सर्वांत जास्त निधी आहे. १०० व्हिस्टाडोम कोच बनवण्याचीही योजना आणि प्रीमिअर ट्रेनच्या १ हजार डब्यांचे नुतनीकरण करण्यात येणार आहे.

मुंबई-अहमदाबाद मार्गावर वंदे भारत ट्रेन धावत आहेत. अशा प्रकारच्या ५०० वंदे भारत ट्रेन निर्माण करण्यात येणार आहेत. यासाठी ६५ हजार कोटींचा निधी अपेक्षित आहे. तसंच एक हजार डब्यांमध्ये वॉटर-मिस्टवर आधारित अग्निशामक यंत्रणा बसवण्याचा विचार करत आहे.

- Advertisement -

- Advertisment -