‘या’ भारतीय चित्रपटाचा स्पेन मधील महाविद्यालयीन अभ्यासक्रमात समावेश, नेमकं प्रकरण काय?

'जिंदगी ना मिलेगी दोबारा' हा चित्रपट खूपच गाजला. तरुणाईला सुद्धा या चित्रपटाने अक्षरशः वेड लावले. या चित्रपटाची थीम, स्टार कास्ट, गाणी, कथा आणि कलाकारांचा अभिनय आणि डान्स या सगळ्याच पातळीवर हा चित्रपट सरस ठरला.

हृतिक रोशन, अभय देओल, फरहान अख्तर, कतरीना कैफ यांची स्टार कास्ट असलेला ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ हा चित्रपट खूपच गाजला. तरुणाईला सुद्धा या चित्रपटाने अक्षरशः वेड लावले. या चित्रपटाची थीम, स्टार कास्ट, गाणी, कथा आणि कलाकारांचा अभिनय आणि डान्स या सगळ्याच पातळीवर हा चित्रपट सरस ठरला. भारतात या चित्रपटाची चांगलीच क्रेझ दिसली. देशात आणि परदेशातही या चित्रपटाला चांगलीच लोकप्रियता मिळाली. पण आज या चित्रपटातील कलाकारांसाठी आणि चाहत्यांसाठी एक आनंदवार्ता समोर आली आहे.

हे ही वाचा – Happy Birthday vandana gupte : वंदना गुप्ते साजरा करतायत त्यांचा ७० वा…

‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ या बहारदार चित्रपटाचा समावेश आता स्पेन मधील महाविद्यालयीन अभ्यासक्रमात करण्यात आला आहे. असं एका मीडिया रिपोर्ट नुसार समोर आलं आहे. हा एक मार्केटिंग मॅनेजमेंट कोर्स आहे आणि आता त्या कोर्सच्या अभ्यासक्रमात हा चित्रपट अभ्यासला जाणार आहे.

हे ही वाचा –  ‘मणिके मागे हिथे’ फेम योहानीची रणवीर सिंह सोबत काम करण्याची इच्छा

कारण काय आहे

‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ या चित्रपटाचे शूटिंग हे स्पेन मध्ये झाले होते. स्पेन मधील काही ठिकाणांचा समावेश सुद्धा करण्यात आला होता. त्यामुळे या चित्रपटाचे एक वैशिष्ट्य म्हणजे या चित्रपटामुळे स्पेनचं टुरिझम सुद्धा वाढण्यास सुद्धा चालना मिळाली. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर स्पेनच्या टुरिझममध्ये ३२ टक्के वाढ झाली. स्पेनच्या अनेक सुंदर ठिकाणी या चित्रपटाचे शूटिंग करण्यात आले आहे. हा चित्रपट प्रदर्शित झालयानंतर या ठिकाणांना भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या सुद्धा वाढली. त्याचबरोबर पर्यटकांच्या संख्येत ३२ टक्क्याहून ६५ टक्के एवढी वाढ झाली आहे. त्यामुळे हा चित्रपट स्पेन मधील महाविद्यालयात मार्केटिंग मॅनेजमेंट कोर्सच्या अभ्यासक्रमात घेण्यात आला आहे.

हे ही वाचा –  hrithik roshan ने गरजवंताला रक्तदान करत चाहत्यांसमोर ठेवला नवा आदर्श

‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ हा चित्रपट २०११ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने मोठ्या प्रमाणावर प्रेक्षक पसंती मिळवली होती. आयुष्याकडे बघण्याचा नवा दृष्टिकोन हा चित्रपट प्रेक्षकांना देतो. त्याच सोबत या चित्रपटात अभिनेता फरहान अख्तर हा शायरी म्हणताना सुद्धा दाखवला आहे. त्या शायरीला सुद्धा अनेकांची पासनाटी मिळाली. जावेद अख्तर यांनी लिहिलेली आणि चित्रपटात फरहान अख्तर याने म्हटलेली ती शायरी ‘दिलों मी बेताबियां लेके चल रहे हो तो जिंदा हो तुम’ हे ऐकून आजही एका वेगळ्या माहोल मध्ये जायला होतं. त्याचसोबत आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन सुद्धा सकारात्मक होतो.

हे ही वाचा –  आमिर खानच्या ‘लाल सिंह चड्ढा’चे चौथे गाणे ‘तुर कलेयां’ प्रदर्शित