Monkeypox Virus : मंकीपॉक्स व्हायरसचा धोका वाढला, नायजेरियामध्ये मंकीपॉक्सचा पहिला बळी

जगभरात कोरोना व्हायरसचा (Corona Virus) धोका कमी होत असतानाच आता मंकीपॉक्सचा (Monkeypox Virus) धोका युरोपीय देशांमध्ये वाढताना दिसत आहे. मंकीपॉक्स या विषाणूने नायजेरियामध्ये पहिला बळी घेतला आहे. नायजेरिया (nigeria) रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्र (CDC) ने रविवारी यासंदर्भात माहिती देत सांगितले की, या वर्षी ६६ संशयित रुग्ण सापडले होते. त्यामधील २१ रुग्ण मंकीपॉक्सचे असल्याची नोंद झाली आहे. नायजेरियासह पश्चिम आणि मध्य आफ्रिकेत या रोगाचा प्रसार झाला आहे.

२०१७ पासून नायजेरियामध्ये मंकीपॉक्स हा विषाणू मोठ्या प्रमाणात पसरलेला नाही. मात्र,यासंबंधीत प्रकरणं आता समोर येत आहेत. २०१७ पासून ३६ पैकी २२ राज्यांमध्ये किमान २४७ प्रकरणं आढळली आहेत. यामध्ये मृत्यू दर ३.६ टक्के आहे, असं सीडीसी यांनी म्हटलं आहे.

युरोप आणि अमेरिकेत मंकीपॉक्सच्या प्रकरणांमध्ये वाढ झाल्याने इतर अनेक देशांमध्येही चिंता वाढली आहे. जगभरात या रोगाचे सुमारे २०० रुग्ण आढळले आहेत. तर २० हून अधिक देशांमध्ये मंकीपॉक्सचा प्रसार झाल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले आहे.

नायजेरियातून ब्रिटनला गेलेल्या एका व्यक्तीला ४ मे रोजी मंकीपॉक्स रोगाचा संसर्ग झाल्याचं निष्पन्न झालं. या ब्रिटिश नागरिकाने देश सोडल्यानंतर नायजेरियामध्ये मंकीपॉक्सच्या सहा प्रकरणांची नोंद झाली. दरम्यान, एका भारतीय खासगी आरोग्य कंपनीने मंकीपॉक्स विषाणूचा शोध घेण्यासाठी रियल-टाइम RT PCR किट बनवलं आहे.

भारतातील खाजगी आरोग्य उपकरण कंपनी Ttrivitron Healthcareने शुक्रवारी मंकीपॉक्स म्हणजेच आर्थोपॉक्स विषाणूचा शोध घेण्यासाठी रिअल-टाइम RT-PCR किट विकसित करण्याची घोषणा केली आहे.


हेही वाचा : MonkeyPox alert : कोरोनानंतर देशात मंकीपॉक्सचा धोका; ‘या’ राज्याकडून अलर्ट जारी