घरCORONA UPDATEसरकारकडून सीरमला ११ लाख लसीच्या डोसची पहिली ऑर्डर, 'ही' असणार किंमत

सरकारकडून सीरमला ११ लाख लसीच्या डोसची पहिली ऑर्डर, ‘ही’ असणार किंमत

Subscribe

१६ जानेवारीपासून देशात कोरोना लसीकरण मोहिम

मागील १० महिन्यांपासून देशात कोरोनाने हाहाकार घातला आहे. परंतु देशात आता लवकरच कोरोना लसीकरणाला सुरुवात होणार आहे. कोरोना लसीकरण करण्याबाबत केंद्र सरकार मोहीम राबवत आहे. यासाठी सरकारने सीरम इन्स्टिट्यूटला ११ लाख ‘कोविशिल्ड’ लसीच्या डोसची पहिली ऑर्डर दिली आहे. तसेच सीरमच्या कोरोना लसीची किंमतही जाहीर करण्यात आली आहे. या लसीच्या एका डोसची किंमत ही २०० रुपये असणार आहे, अशी माहिती सीरमच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

- Advertisement -

१६ जानेवारीपासून देशात कोरोना लसीकरण मोहिम

मागील १० महिन्यांपासू प्रतिक्षा असलेल्या कोरोना लसीकरणची मोहिम देशात १६ जानेवारीपासून सुरू होणार आहे. कोरोना लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात कोरोना योद्ध्यांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये अत्यावश्यक सेवेतील ३ कोटी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना लस देण्यात येणार आहे. यानंतर ५० वर्षांपवरील नागरिकांना तसेच गंभीर आजाराने ग्रासलेल्या नागरिकांना लस देण्यात येईल.

- Advertisement -

देशात कोरोना लसीचा पुरवठा करण्यासाठी सीरम इन्स्टिट्यूट पूर्ण तयारीनिशी सज्ज असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. कूल-एक्स कोल्ड चैन लिमिटेड कंपनी देशात लसीची वाहतूक करणार आहे. तसेच कोरोना लसीची वाहतूक करण्यासाठी सीरम कंपनीच्या बाहेर कोल्ड स्टोरेज वाहने देखील सज्ज ठेवली आहेत.


हेही वाचा –  केंद्र सरकार करणार पहिल्या टप्प्यातील लसीकरणाचा खर्च – पंतप्रधान


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -