घरताज्या घडामोडीएचआयव्हीवर मात करणाऱ्या पहिल्या व्यक्तीचा कँन्सरमुळे मृत्यू

एचआयव्हीवर मात करणाऱ्या पहिल्या व्यक्तीचा कँन्सरमुळे मृत्यू

Subscribe

टीमोथी ब्राउन यांना जगभरात 'बर्लिन पेशंट' म्हणून ओळखले जात होते.

एचआयव्हीची लागण झाल्यानंतर त्यातून रूग्ण कधीच बरा होत नाही असा समज आजवर होता. मात्र, एचआयव्ही सारख्या आजावर मात करणारा जगातील एकमेव व्यक्ती म्हणजे ‘टिमोथी रे ब्राउन’. एचआयव्ही सारख्या गंभीर आजारावर त्यांनी मात केली. पण त्यांची कँन्सरशी झुंज मात्र अपयशी ठरली. वयाच्या ५४व्या वर्षी त्यांचा कॅलिफोर्नियात कँन्सरमुळे मृत्यू झाला.

टीमोथी रे ब्राउन यांना १९९६ साली एचआयव्हीची लागण झाल्याचे समोर आले होते. एचआयव्ही वरील उपचारासाठी बोनमॅरो ट्रान्सप्लांट करण्यात आले होते. बोनमॅरो दात्याच्या डीएनएमधल्या CCR5 जीनमध्ये म्युटेशन होते.त्यामुळे एचआयव्ही विरोधात रोगप्रतिकारक क्षमता निर्माण झाली. त्यामुळे टीमोथी ब्राउन हे २००८ मध्ये एचआयव्हीमुक्त झाल्याचे जाहिर करण्यात आले.टीमोथी ब्राउन यांना जगभरात ‘बर्लिन पेशंट’ म्हणून ओळखले जात होते. टीमोथी यांनी एचआयव्हीवर मात केल्यानंतर जगभरातील डॉक्टरांना आशेचा किरण मिळाला होता. एचआयव्ही झालेल्या प्रत्येक रूग्णाला एक दिवस आपणही या विषाणूवर मात करू असं वाटू लागलं.

- Advertisement -

एचआयव्ही मधून बरे होताच टीमोथी ब्राउन यांना कँन्सरची लागण झाल्याचे समोर आले. मागील काही दिवसांपासून त्यांची प्रकृती ठासळत गेली. ब्राउन यांच्यावर जर्मनीतील डॉक्टर उपचार करत होते. टीमोथी ब्राउन हे बर्लिन येथील एका कॅफेत जर्मनी आणि इंग्रजी ट्रान्सलेटर म्हणून काम करत होते.


हेहि वाचा – देशात महिला अत्याचाराच्या घटनेत वाढ; गुन्ह्यांत राजस्थान अव्वल तर सुशिक्षित केरळ दुसऱ्या स्थानी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -