घरदेश-विदेशरशियाने कोरोनावर बनवली पहिली लस

रशियाने कोरोनावर बनवली पहिली लस

Subscribe

राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी मुलीला दिला पहिला डोस

जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले असताना आतापर्यंत १ कोटी ९० लाखांहून जास्त लोक कोरोनाच्या विळख्यात अडकले आहेत. अनेक देशाचे संशोधक कोरोनावरील लस शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी मंगळवारी रशियाने कोरोनावरील पहिली लस बनवल्याची घोषणा केली आहे. जगातील ही पहिली कोरोना लस आहे, असा दावा त्यांनी केला आहे. रशियाच्या आरोग्य मंत्रालयाकडूनही कोरोनावरील या लसीला मान्यता देण्यात आली आहे. इतकेच नाही तर राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या मुलीनेही लस घेतली आहे.

ही लस मॉस्कोच्या गामेल्या इन्स्टिट्यूटने विकसित केली आहे. मंगळवारी रशियाच्या आरोग्य मंत्रालयाने ही लस यशस्वी ठरल्याचे मान्य केले आहे. त्यामुळे व्लादिमीर पुतीन यांनी घोषित केले आहे की, लवकरच रशिया या लसीच्या उत्पादनाचे काम सुरू करेल आणि मोठ्या संख्येने लसीचे डोस तयार करण्यावर त्यांचा भर असेल.अलीकडेच व्लादिमीर पुतीन यांच्या मुलीला कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर उपचारादरम्यान मुलीला नवीन लस देण्यात आली. काही वेळानंतर तिच्या शरीराचे तापमान वाढले.

- Advertisement -

पण आता ती पूर्णपणे बरी झाली आहे, असे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी सांगितले. रशियामध्ये कोरोनाची लस विकसित करण्याचे काम गामेल्या रिसर्च इन्स्टिट्यूटकडून केले जात होते. ही संस्था रशियाच्या आरोग्य मंत्रालयाच्या अंतर्गत आहे. नॅशलन रिसर्च सेंटरचे निर्देशक अलेक्जेंडर गिंट्सबर्ग यांनी दिलेल्या माहितीनुसार एडेनो व्हायरसवर आधारीत ही लस तयार करण्यात आली आहे. ही लस पूर्णपणे सुरक्षित असून या लसीमुळे व्यक्तीच्या आरोग्याला नुकसान पोहोचण्याची शक्यता फार कमी आहे, असा दावा करण्यात आला होता.

कशी घेतली लसीची चाचणी?
अलेक्जेंडर गिंट्सबर्ग यांनी सांगितले होते की, काही लोकांना लस दिल्यानंतर ताप आल्याचे दिसून आले. कारण लस घेतल्यानंतर रोगप्रतिकारकशक्तीवर परिणाम होतो. त्यामुळे अनेकदा शरीराचे तापमान वाढते. पण सामान्य पॅरासिटोमॉल किंवा इतर औषध घेऊन ताप सहज कमी होऊ शकतो. चाचण्या केल्यानंतर स्वयंसेवकांच्या आरोग्यावर सकारात्मक बदल घडून आले असून रोगप्रतिकारकशक्ती वाढली. वरिष्ठ नागरिक आणि आरोग्य सेवेतील कामगारांना लस सगळ्यात आधी देण्यात येणार आहे. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार चाचणीदरम्यान या लसीचे सकारात्मक परिणाम दिसून आले आहेत. ऑक्टोबरमध्ये देशभरात लसीकरण करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जाणार आहेत.

- Advertisement -

ऑक्टोबरपासून रशियात लसीकरण
ऑक्टोबरपासून रशियात लसीकरण सुरू करता येऊ शकेल, असे रशियाने म्हटले आहे. रशियाने जगभरात लस पुरविण्याविषयी सांगितले आहे, परंतु बरेच देश अजूनही याबद्दल संकोच करत आहेत. पाश्चात्य देशांसह जागतिक आरोग्य संघटनेनेही चिंता व्यक्त केली आहे. पुरेशा डेटाशिवाय लस पुरवठा करणे योग्य होणार नाही, असे पाश्चात्य देशांचे म्हणणे आहे.

सर्वात आधी लसीचा डोस कोणाला?
रशियन आरोग्यमंत्री मिखाईल मुराश्को यांच्या म्हणण्यानुसार, या महिन्यात आरोग्य कर्मचार्‍यांना लस देण्याचे काम सुरू केले जाईल. रशियामध्ये, प्रथम आरोग्य कर्मचार्‍यांना कोरोनाची लस दिली जाईल. यानंतर ज्येष्ठ नागरिकांना ही लस दिली जाईल. ही लस बाजारात कधी येईल? सध्या या लसीची मर्यादित डोस तयार करण्यात आले आहेत. नियामक मान्यता प्राप्त झाली आहे. म्हणून आता या लसीचे औद्योगिक उत्पादन सप्टेंबरपासून सुरू होऊ शकेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -