घर देश-विदेश G-20 ची बैठक अनेक समस्यांवर मार्ग काढण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरली; जो बायडननी केले...

G-20 ची बैठक अनेक समस्यांवर मार्ग काढण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरली; जो बायडननी केले भारताचे कौतुक

Subscribe

जो बिडेन यांनी भारतात झालेल्या G20 शिखर परिषदेमुळे आनंदी वाटले, अनेक प्रश्न सोडवण्यात यंदाची परिषद यशस्वी झाल्याचे म्हणत ते भारतातून व्हिएतनामकडे रवाना झाले.

नवी दिल्ली : दोन दिवशीय जी-20 शिखर परिषदेच्या समाप्तीची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्यानंतर जगभरातून आलेले विदेशी पाहुणे आता परतीच्या वाटेवर आहेत. यामध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडनही आहेत. जो बिडेन यांनी भारतात झालेल्या G20 शिखर परिषदेमुळे आनंदी वाटले, अनेक प्रश्न सोडवण्यात यंदाची परिषद यशस्वी झाल्याचे म्हणत ते भारतातून व्हिएतनामकडे रवाना झाले.(The G-20 meeting was instrumental in finding a way forward on several issues; Joe Biden praised India)

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी ट्वीटमध्ये म्हटले की, जेव्हा संपूर्ण विश्व जलवायू आणि आर्थिक संकटात आहे तेव्हा जी-20 शिखर परिषदेने हे सांगून दिले की, आपण सगळेजण याही परिस्थितीत या संकटावर मात करू शकतो

आंतरराष्ट्रीय कायद्याचे पालन करण्याचे आवाहन

- Advertisement -

नवी दिल्ली येथे पार पडलेल्या जी-20 शिखर परिषदेमध्ये जाहीरनाम्यात अनेक मोठ्या गोष्टींचा अवलंब करण्याचे मान्य करण्यात आले आहे. या घोषणेने देशांना प्रादेशिक अखंडता, आंतरराष्ट्रीय मानवतावादी कायदा आणि शांतता आणि स्थिरतेचे संरक्षण करणारी बहुपक्षीय व्यवस्था यासह आंतरराष्ट्रीय कायद्याचे समर्थन करण्याचे आवाहन केले.

हेही वाचा : G20 Summit : विदेशी महिलांना भारतीय पेहरावाची भुरळ, साडी आणि सलवारसूटला पसंती

परिषदेत या जाहीरनाम्यांचाही आहे समावेश

- Advertisement -

पार पडलेल्या बैठकीत विविध प्रकारच्या जाहीरनाम्यांचा समावेश आहे. त्यामध्ये चांगल्या भविष्यासाठी ग्रीन ग्रोथ कराराचीही कल्पना आहे. यामध्ये स्वच्छ इंधन, हायड्रोजनचे ऐच्छिक तत्त्व, उत्तम अर्थव्यवस्था आणि अन्नसुरक्षा याबाबत सर्व देशांत एकमत झाले आहे.

हेही वाचा : G-20 ची बैठक संपताच भारताचे चीनला थेट आव्हान; लडाखमध्ये उभारणार सर्वात मोठे हवाई तळ

रशियानेही केले कौतुक

जी-20 नेत्यांच्या घोषणेवर सर्व देशांचे एकमत झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी ही घोषणा केली. अमेरिकेसह रशियाने या घोषणेचे कौतुक केले आहे. रशियाने या जाहीरनाम्याचे समतोल असे वर्णन केले आहे. तर युक्रेन युद्धावर रशियाचा निषेध करणे टाळले. नवी दिल्लीत केलेल्या सर्वसंमतीची घोषणा स्वीकारली आणि कोणताही प्रदेश ताब्यात घेण्यासाठी बळाचा वापर न करण्याचे आवाहन केले.

 

- Advertisment -