घरक्राइमसंशयाचं भूत डोक्यात शिरलं, अख्ख्या परिवाराला स्मशानात घेऊन गेलं; नेमकं काय घडलं?...

संशयाचं भूत डोक्यात शिरलं, अख्ख्या परिवाराला स्मशानात घेऊन गेलं; नेमकं काय घडलं? वाचा-

Subscribe

पश्चिम बंगालमधील उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील एका फ्लॅटमध्ये कुटुंबातील सर्व सदस्य मृतावस्थेत आढळल्याची घटना घडली.

कोलकाता : संसरात महत्वाचा असतो तो विश्वास. पती पत्नीचा एकमेकांवर विश्वास असल्यावरच हे नातं खुलतं आणि फुलतंसुद्धा. परंतू याच संसरात एकमेकांवरील विश्वास उडाल्यानंतर घडतात त्या वाइट घटना. अगदी अशीच एक घटना पश्चिम बंगालमध्ये घडली असून, डोक्यात संशयाचं भूत शिरलेल्या एका व्यक्तीने संपूर्ण परिवारालाच संपून टाकल्याची घटना उघडकीस आली आहे. (The ghost of suspicion entered the head took the whole family to the graveyard What exactly happened read)

पश्चिम बंगालमधील उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील एका फ्लॅटमध्ये कुटुंबातील सर्व सदस्य मृतावस्थेत आढळल्याची घटना घडली. मागील काही दिवसांपासून शेजारी, परिसरातील लोकांना फ्लॅटमधून दुर्गंधी येत होती. यानंतर पोलिसांना माहिती दिल्यावर त्यांनी दरवाजा तोडला. यानंतर कुटुंबातील सर्व सदस्यांचे मृतदेह इकडे तिकडे पडलेले दिसले. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

52 वर्षीय वृंदावन कर्माकार यांनी पत्नी आणि मुलांची विष देऊन हत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. तर विष देऊन स्वतः कर्माकर यांनेही गळफास घेऊन आत्महत्या केली.
खर्डा येथील फ्लॅटमधून दुर्गंधी येत असल्याची तक्रार शेजाऱ्यांनी पोलिसांकडे केली होती. या तक्रारीवरून पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला असता त्यांना घटनास्थळी चार मृतदेह आढळून आले. वृंदावन कर्माकार मृतदेह पंख्याला लटकलेला होता. याशिवाय त्यांची पत्नी देबश्री हिचा मृतदेहही याच खोलीत आढळून आला. 17 वर्षांची मुलगी देबालिना आणि 8 वर्षांचा मुलगा उत्साह यांचेही मृतदेह फ्लॅटमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आढळून आले. घटनास्थळावरून एक सुसाईड नोटही जप्त करण्यात आली असून, त्यावरून या संपूर्ण प्रकरणाचा उलगडा झाला आहे. वास्तविक हे पत्र वृंदाबन कर्माकर यांनी लिहिलेले आहे. या चिठ्ठीत त्याने पत्नी देबश्रीचे विवाहबाह्य संबंध असल्याचा दावा केला असून, याच संशयापोटी त्यांने हे पाऊल उचलल्याचा उलगडा झाला आहे.

हेही वाचा : MITCHELL MARSH : सामना जिंकल्यानंतर खेळाडूचे ट्रॉफीसोबत लाजिरवाणे कृत्य; सोशल मीडियावर तुफान ट्रोल

- Advertisement -

बेल वारंवार वाजत राहली पण…

एका स्थानिक तृणमूल नेत्याने सांगितले की, इमारतीतील पाण्याचा पंप चालवणाऱ्या वृंदाबन कर्माकर यांच्या फ्लॅटवर एक व्यक्ती गेला होता. काही चाव्या घेण्यासाठी तो फ्लॅटवर गेला असता काहीच उत्तर मिळाले नाही. त्यांनी पुढे सांगितले की, तो माणूस दारावरची बेल वारंवार वाजवत राहिला, पण आतून आवाज आला नाही. याशिवाय दुर्गंधीही येत होती. यावर त्यांनी स्थानिक नगरसेवकाला सांगितले, त्यांच्यामार्फत पोलिसांना माहिती मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून दरवाजा तोडला असता घटनास्थळी चार मृतदेह आढळून आले.

हेही वाचा : संजय राऊतांकडून भाजपाच्या नेत्याचा कथित फोटो ट्वीट; काँग्रेसने सीबीआय चौकशीची केली मागणी

राजस्थानमध्येही घडली होती अशीच घटना

मागील वर्षी नोव्हेंबर 2022 मध्ये राजस्थानमधील उदयपूर जिल्ह्यात एकाच कुटुंबातील 6 जणांचे मृतदेह सापडले होते. या मृतांमध्ये 4 लहान मुलांचा समावेश होता. या संपूर्ण कुटुंबाने एकत्र आत्महत्या केली की त्यांचा मृत्यू संशयास्पद परिस्थितीत झाला हे अद्याप स्पष्ट झालेले नव्हते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -