घरदेश-विदेशPositive News ! जन्मताच कोरोनानो गाठल खरं, चिमुरडीची पाचव्याच दिवशी कोरोनावर मात

Positive News ! जन्मताच कोरोनानो गाठल खरं, चिमुरडीची पाचव्याच दिवशी कोरोनावर मात

Subscribe

आठव्या महिन्यात कोरोना संक्रमित आईच्या गर्भातून जन्म घेतलेल्या या नवजात चिमुखलीने मात्र आगदी पाच दिवसातच तिने कोरोनाला हरवले आहे.

कोरोना सारख्या आजाराने संपूर्ण देश हादरला आहे. या जीवघेण्या कोरोनामुळे संपूर्ण जग त्रासले आहे. काहीजण ह्या आजारातून बरे झालेत तर काही जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे रोज हजारों लोकांचा बळी जाताना ऐकायला मिळते. पण काहीजण याभयंकर आजारातून योग्य ती काळजी घेत बरे होता आहेत. अशाच एका चिमुखलीला जन्मताच कोरोनाने गाठले आहे. आठव्या महिन्यात कोरोना संक्रमित आईच्या गर्भातून जन्म घेतलेल्या या नवजात चिमुखलीने मात्र आगदी पाच दिवसातच तिने कोरोनाला हरवले आहे.

उत्तर प्रदेशच्या मुगलसराय येथील रहिवाशी आनंद शर्मा यांची पत्नी संगीता शर्मा ही गरोदर होती. संगीताची प्रसुतीही पटना येथे व्हावी अशी तिच्या माहेरच्यांची इच्छा होती. यासाठी ती पटनाला गेली. आठव्या महिन्यात संगीताला खोकला, सर्दी झाली. यानंतर डॉक्टरांशी फोनवर उपचार घेणे सुरू केले, परंतु आजार कमी होण्याऐवजी वाढला. घरातील लोकांनी घाईघाईने संगीताला आरा येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. तिची ऑक्सिजनची पातळी वेगाने कमी होऊ लागली. बाळाला आईकडून ऑक्सिजन मिळते. अशा परिस्थितीत आई व मुलगी दोघांच्याही जीवाला धोका वाढू लागला. तोपर्यंत संगीताचा अहवालही पॉझिटिव्ह आला होता. डॉक्टरांनी सांगितले की संगीताला व्हेंटिलेटरवर ठेवावे लागू शकते, अशा परिस्थितीत तिला पटना येथे नेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला.

- Advertisement -

याबाबत माहिती देताना संगीताचा भाऊ अजय म्हणाला की, 27 एप्रिल रोजी ते संगीताला घेवून पाटणायेथील एम्स रुग्णालयात पोहोचले. प्रकृती चिंताजनक झाल्याने डॉक्टरांनी त्यांना दाखल केले. जीव वाचवण्यासाठी, वेळेपूर्वी डिलिव्हरी पूर्ण करण्याचे आव्हान होते. ३० एप्रिल रोजी बर्‍याच प्रयत्नांनंतर डॉक्टरांनी नॉर्मल प्रसूती केली. संगीताचे बाळ कोरोना संक्रमित नसेल असा अंदाज असल्यामुळे तिला सामान्य वॉर्डमध्येच ठेवण्यात आले होते. मात्र एके दिवशी धक्कादायक रिपोर्ट समोर आला आणि संगीताची मुलगीही कोरोना पॉझिटिव्ह निघाली. यानंतर तिला यानंतर १ मे रोजी तिला कोविड केअर युनिटमध्ये खास देखरेखीखाली ठेवले. परंतु त्याने अवघ्या ५ दिवसात या चिमुखलीने कोरोना विषाणूचा पराभव केला.


हे वाचा-   गरम पाण्याची अंघोळ, गरम पाणी प्यायल्याने कोरोना होत नाही? केंद्राचे स्पष्टीकरण

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -