Eco friendly bappa Competition
घर देश-विदेश शेतकऱ्यांच्या मदतीला सरकार आले धावून; अल्पदरात मिळणार 3 लाखापर्यंतचे कर्ज

शेतकऱ्यांच्या मदतीला सरकार आले धावून; अल्पदरात मिळणार 3 लाखापर्यंतचे कर्ज

Subscribe

शेतकऱ्यांना कर्ज मिळण्यात येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी नवीन पोर्टल सुरू केले आहे. वित्त मंत्रालयाने Kisan Rin Portal सुरू केले असून, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी त्याची सुरुवात केली.

नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन केंद्र सरकार सर्वसामान्यांसाठी विविध योजना आणत आहे. मागील महिन्यांत रक्षाबंधन सणाचे औचित्य साधून घरगुती सिलिंडरचे दर कमी केले होते. तर आता शेतकऱ्यांना मिळणाऱ्या कर्जाच्या अडचणी लक्षात घेता नवीन पोर्टल सुरू करण्यात आले असून, त्यामाध्यमातून शेतकऱ्यांना आता अल्पदरात कर्ज मिळणार आहे.(The government came running to help the farmers Loans up to 3 lakhs available at low rates)

शेतकऱ्यांना कर्ज मिळण्यात येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी नवीन पोर्टल सुरू केले आहे. वित्त मंत्रालयाने Kisan Rin Portal सुरू केले असून, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी त्याची सुरुवात केली. या पोर्टलच्या माध्यमातून Kisan Creadit Card खातेधारकांची पडताळणी आधारसोबत केली जाणार आहे. या पोर्टलवर लाभार्थ्यांची माहिती उपलब्ध असणार आहे. याद्वारे 7 टक्के व्याजाने 3 लाख रुपयांचे कर्ज उपलब्ध करून दिले जाईल, असे मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे. या कर्जाची एका वर्षात परतफेड केल्यावर 3 टक्के व्याजाचे पैसेही शेतकऱ्यांच्या खात्यावर परत येतील, म्हणजेच हे कर्ज चार टक्के व्याजदराने दिले जाणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा : महाराष्ट्राच्या सूनबाई IAS टीना डाबी यांच्या घरी गुडन्यूज; देशभरातून शुभेच्छांचा वर्षाव

असे करणार Kisan Rin Portal

आधार क्रमांकाद्वारे Kisan Rin Portal वर शेतकऱ्यांची नोंदणी केली जाणार आहे. सोबतच नोंदणी नसलेल्या शेतकऱ्यांचीही नोंदणी केली जाणार आहे. याशिवाय घरोघरी Kisan Creadit Card मोहीमही राबविण्यात येणार आहे. या अंतर्गत 1.5 कोटी नवीन शेतकरी सहभागी होऊ शकतात. या योजनेंतर्गत परवडणारी कर्जे उपलब्ध होणार आहेत. बँका आणि नाबार्डच्या सहकार्याने पंचायतीच्या सहकार्याने हे काम केले जाणार आहे. आतापर्यंत KCC ची पडताळणी मॅन्युअल होती आणि त्यामुळे मॉनिटरिंग कठीण होते. त्यांची देयके वेळेवर होत नसल्याची तक्रार बँकेकडे येत असत यातून आता सुटका होणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा : INDIA आघाडीत आणखी एक पक्ष होणार सहभागी; प्रियंका गांधींनी घेतला पुढाकार

अजूनही दीड कोटी शेतकरी वंचित

आतापर्यंत 7 कोटी 50 लाख शेतकरी किसान क्रेडिट कार्ड धारक आहेत. मात्र अद्यापही दीड कोटी शेतकरी यापासून वंचित आहेत. त्यामुळे या वंचित शेतकऱ्यांना या योजनेत समाविष्ट करण्यासाठी ही योजना आणल्या गेली आहे. दोन वर्षांचा शेतकऱ्यांशी संबंधित डेटा त्यात टाकला जात आहे.

- Advertisment -