घरदेश-विदेशबिल्किस बानोप्रकरणातील सुटलेल्या आरोपींविरोधात २९ नोव्हेंबरला होणार सुनावणी

बिल्किस बानोप्रकरणातील सुटलेल्या आरोपींविरोधात २९ नोव्हेंबरला होणार सुनावणी

Subscribe

नवी दिल्ली – २००२ साली गुजरातमध्ये घडलेल्या गोध्रा हत्याकांड दरम्यान बिल्किस बानो या महिलेवर सामूहिक बलात्कार झाला होता. या बलात्कार प्रकरणी ११ दोषींना सोडण्यात आलं होतं. दोषींना सोडण्यात आल्याने सर्वोच्च न्यायालयात याविरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर २९ नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार आहे. याप्रकरणी सीबीआयने चौकशी केली होती. त्यामुळे गुजरात सरकारने या दोषींची केलेली सुटका म्हणजे एकतर्फी निर्णय असल्याचं या याचिकेत सांगण्यात आलं आहे.

सुनावणीदरम्यान, न्यायमूर्ती अजय रस्तोगी आणि न्यायमूर्ती सीटी रविकुमार यांच्या खंडपीठाने गुजरात सरकारने दाखल केलेले उत्तर सर्व पक्षांना उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले आहेत. गुजरात सरकारने दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रावर उत्तर दाखल करण्यासाठी याचिकाकर्त्यांना वेळ देण्यात आला आहे. खंडपीठाने सांगितले की, गुजरात सरकारने काउंटर दाखल केला आहे. गुजरात सरकारने सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सांगितले की, दोषींना सोडण्यात आल्याने त्याविरोधात आव्हान देणारे याचिकाकर्ते एक “इंटरलूपर” आणि “व्यस्त व्यक्ती” आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – Bilkis Bano प्रकरणात मोठा खुलासा, आरोपींच्या सुटकेसाठी दोन आठवड्यांत दिली होती मान्यता

यापूर्वी सोमवारी (17 ऑक्टोबर) गुजरात सरकारने दोषींच्या सुटकेबाबत सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले होते. गुजरात सरकारने म्हटले आहे की, गृहमंत्रालयाची मंजुरी मिळाल्यानंतरच दोषींना सोडण्यात आले. माफी धोरणांतर्गत सर्व दोषींची तुरुंगातून सुटका करण्यात आली आहे. या प्रकरणी जनहित याचिका दाखल करणे हा कायद्याचा दुरुपयोग आहे. त्याच वेळी, सरकारी बाजूने असा युक्तिवाद केला की आमचा प्राथमिक आक्षेप आहे की एखाद्या अनोळखी व्यक्तीला फौजदारी खटल्यात याचिका करण्याची परवानगी दिली जाऊ शकत नाही.

- Advertisement -

2008 मध्ये सर्व दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. परंतु गुजरात सरकारने 2022 मध्ये त्यांची सुटका केली. 21 जानेवारी 2008 रोजी मुंबईतील विशेष सीबीआय न्यायालयाने खून आणि सामूहिक बलात्कार प्रकरणात सर्व 11 आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. नंतर मुंबई उच्च न्यायालयाने त्यांची शिक्षा कायम ठेवली. या दोषींनी 15 वर्षांहून अधिक काळ तुरुंगात शिक्षा भोगावी लागली. त्यानंतर त्यांच्यापैकी एकाने त्याच्या मुदतपूर्व सुटकेसाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. सर्वोच्च न्यायालयाने गुजरात सरकारला 1992 च्या धोरणानुसार त्याची शिक्षा माफ करण्याच्या मुद्द्याकडे लक्ष देण्याचे निर्देश दिले होते. यानंतर सरकारने एक समिती स्थापन करून सर्व दोषींची मुदतपूर्व सुटका करण्याचे आदेश जारी केले.

गोध्रा घटनेनंतर गुजरातमध्ये दंगली उसळल्या आणि या दंगलीदरम्यान ३ मार्च २००२ रोजी दाहोद जिल्ह्यातील लिमखेडा तालुक्यातील रंधिकपूर गावात जमावाने बिल्किस बानोच्या कुटुंबावर हल्ला केला. बिल्किस बानो, जी त्यावेळी पाच महिन्यांची गर्भवती होती, तिच्यावर सामूहिक बलात्कार झाला आणि तिच्या कुटुंबातील सात सदस्यांची दंगलखोरांनी निर्घृणपणे हत्या केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -