घरCORONA UPDATECorona Update: चिंताजनक! पहिल्यांदाच देशातील नवीन रुग्णसंख्येत सर्वाधिक वाढ!

Corona Update: चिंताजनक! पहिल्यांदाच देशातील नवीन रुग्णसंख्येत सर्वाधिक वाढ!

Subscribe

एकबाजूला देश कोरोनाच्या संकटाशी सामना करताना दिसत आहे. तर दुसऱ्या बाजूला अशा परिस्थितीत भारत-चीन दरम्यान तणाव वाढत असल्याचे दिसत आहे. दरम्यान देशातील कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असून २४ तासांत पहिल्यांदाच रुग्णसंख्येत सर्वाधिक वाढ झाल्याचे समोर येत आहे. देशात मागील २४ तासांत १२ हजार ८८१ कोरोनाचे नवे रुग्ण आढळले असून ३३४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ३ लाख ६६ हजार ९४६ वर पोहोचला असून एकूण मृतांचा आकडा १२ हजार २३७ झाला आहे. तसेच २४ तासांत ७ हजार ३९० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून एकूण १ लाख ९४ हजार ३२५ रुग्ण बरे झाले आहेत. देशातील रिकव्हरीचा रेट ५२.९५ टक्के इतका आहे. तर सध्या १ लाख ६० हजार ३८४ कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत.

- Advertisement -

महाराष्ट्र आणि दिल्ली मृत्यूची नोंद वाढल्याने देशातल्या मृत्यू संख्येतही वाढ झाली आहे. तसेच बुधवारी सर्वाधिक नवीन रुग्णांची सर्वाधिक नोंद महाराष्ट्र आणि दिल्ली झाली आहे. बुधवारी महाराष्ट्रात ३ हजार ३०७ तर दिल्लीत २ हजार ४१४ नव्या कोरोना रुग्णांचा नोंद झाली आहे.

महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून आतापर्यंत १ लाख १६ हजार ७५२ कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा झाला आहे. तसेच ५ हजार ६५१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर ५९ हजार १६६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या महाराष्ट्रात ५१ हजार ९२२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – आईच्या औषधासाठी, शाळेच्या फीसाठी ‘तो’ उचलतो कोरोना रुग्णांचे मृतदेह

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -