Thursday, February 25, 2021
27 C
Mumbai
घर देश-विदेश सुरक्षा दर्जाचा खर्च निश्चित करणे अवघड, गृहमंत्रालयाने दिले उत्तर

सुरक्षा दर्जाचा खर्च निश्चित करणे अवघड, गृहमंत्रालयाने दिले उत्तर

भिनेत्री कंगना रणौत आणि इतर व्यक्तींवर सुरक्षा देण्यासाठी किती खर्च होतो हे सांगणे कठीण असून सुरक्षा पुरवलेल्या खर्चाबाबतची माहिती कोणालाही दिलेली नाही.

Related Story

- Advertisement -

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणानंतर सतत चर्चेत असलेली आणि वादाच्या भोवऱ्यात असलेली अभिनेत्री कंगना रणौतला केंद्र सरकारने वाय दर्जाची सुरक्षा पुरवली होती. अभिनेत्री कंगना रणौतच्या जिवितास धोका निर्माण झाला होता. त्यामुळे केंद्र सरकारद्वारे कंगनाला वाय दर्जाची सुरक्षा पुरवण्यात आली होती. त्यावेळी कंगना हिमाचल प्रदेशात होती परंतु महाराष्ट्र सरकारमधील काही नेत्यांसोबत कंगना ट्विटर वादात सहभागी होती. कंगनाला दिलेल्या सुरक्षा कवच पुवरले होते यावर किती खर्च झाला असा प्रश्न माहितीच्या अधिकाराखाली गृहमंत्रालयाला विचारण्यात आला होता. यावर गृहमंत्रालयाने उत्तर दिले आहे की, अभिनेत्री कंगना रणौत आणि इतर व्यक्तींवर सुरक्षा देण्यासाठी किती खर्च होतो हे सांगणे कठीण असून सुरक्षा पुरवलेल्या खर्चाबाबतची माहिती कोणालाही दिलेली नाही.

अभिनेत्री कंगना रणौतने गेल्या काही दिवसांपूर्वी शेतकरी आंदोलनावर वादग्रस्त ट्विट करत ते डिलीट केले होते. तर मागील वर्षी सप्टेंबरमध्ये अभिनेता सुशांत सिंह आत्महत्याप्रकरणी केलेल्या वक्तव्यामुळे कंगनाला धमक्या आल्या होत्या त्यामुळे केंद्राने कंगनाला वाय दर्जाची सुरक्षा पुरवली होती. या वाय दर्जाच्या सुरक्षेमध्ये ११-१२ तास कर्मचाऱ्यांद्वारे सुरक्षा दिली जाते. तसेच आता कंगनाला केंद्रीय राखीव दलाचे सुरक्षा कवच देण्यात आले आहे.

- Advertisement -

जम्मूमधील रहिवासी रोहित चौधरी यांनी माहितीच्या अधिकाराखाली सुरक्षा दर्जावर किती खर्च करण्यात येतो असा सवाल गृहमंत्रालयाला विचारला होता. यावर गृहमंत्रालयाने उत्तर देत म्हटले आहे की, आम्ही अभिनेत्री आणि इतर व्यक्तींना सुरक्षा पुरवण्याबाबतची माहिती कोणालाही दिलेली नाही.

सुरक्षेसाठी होणारा खर्च निश्चित करणे अवघड आहे. कारण त्यात सुरक्षा कर्मचारी, संप्रेषण, वाहतूक वाहने इत्यादींचा खर्च आणि भत्ता समाविष्ट आहे. तसेच हे वेगवेगळ्या सुरक्षा एजन्सीच्या प्रमुखांच्या अंतर्गत आहे. या सुरक्षेवर राज्य सरकार देखील खर्च करतात. दौऱ्यावर असलेल्या व्यक्तींच्या सुरक्षेवर राज्य सरकारला खर्च करावा लागतो. त्यामुळे सुरक्षेवरील खर्च निश्चित करणे अवघड आहे. असे गृहमंत्रालयाने म्हटले आहे.

- Advertisement -