घरCORONA UPDATECoronaVirus: ७० वर्षीय जेष्ठाला रुग्णालयाने दिले ८.३५ कोटी रुपयांचे बिल

CoronaVirus: ७० वर्षीय जेष्ठाला रुग्णालयाने दिले ८.३५ कोटी रुपयांचे बिल

Subscribe

रुग्णालय प्रशासनाने ११ लाख डॉलर्स म्हणजेच सुमारे ८ कोटी ३५ लाख ५२ हजार रुपयांचे बिल ज्येष्ठांकडे सोपविले.

जगात कोरोना व्हायरसचे केंद्र बनलेल्या अमेरिकेत प्रत्येक व्यक्तीचे प्राण वाचवणे खूपच अवघड आहे. अमेरिकेत वृद्ध लोकांमुळे मृत्यूचे प्रमाण सर्वाधिक आहे. दरम्यान, सिएटल शहरातील रुग्णालयातील डॉक्टरांनी ७० वर्षीय वृद्धांला कोरोनाच्या मृत्यूपासून वाचवले. वृद्ध व्यक्ती ६२ दिवसांपासून कोरोनाबरोबर युद्ध करत असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, जेव्हा डिस्चार्जची त्याची वेळ होती तेव्हा रुग्णालय प्रशासनाने ११ लाख डॉलर्स म्हणजेच सुमारे ८ कोटी ३५ लाख ५२ हजार रुपयांचे बिल ज्येष्ठांकडे सोपविले.

माइकल फ्लोर असे जेष्ठांचे नाव सांगितले गेले आहे. त्यांना ४ मार्च रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. एक वेळ अशी आली की, कोरोनापासून सतत त्यांची तब्बेत बिघडत चालली होती. त्यावेळी नर्सने जेष्ठांच्या कुटूंबाला भेटण्यास बोलाविण्याचा विचार केला होता. पण, डॉक्टरांच्या प्रयत्नानंतर ६२ दिवस कोरोनाशी लढाई करून ते बरे झाले. अखेर ५ मे रोजी त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले. रुग्णालय सोडताना त्यांच्याकडे १८१ पानांचे बिल देण्यात आले.

- Advertisement -

मायकलने एका स्थानिक वृत्तपत्राला सांगितले की, दररोज आयसीयूसाठी त्याच्याकडून ७.३९ लाख रुपये आकारले जात होते. याशिवाय त्यांना निर्जंतुकीकरण कक्षात ४२ दिवस ठेवण्यासाठी ४ लाख ९ हजार डॉलर्स (३ कोटी १० लाख रुपये) आकारले गेले. तसेच २९ दिवस व्हेंटिलेटरवर ठेवण्यासाठी ८२ हजार डॉलर (६२ लाख २८ हजार) आणि दोन दिवस जीव धोक्यात आला होता, त्यावेळी केलेल्या उपचारासाठी १ लाख डॉलर (७६ लाख रुपये) चार्ज करण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -