आज राष्ट्रपतींच्या हस्ते होणार मुगल गार्डनचं उद्घाटन

दिल्लीतील मुगल गार्डनचं उद्घाटन आज, सोमवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते होणार आहे. मात्र नागरीकांसाठी हे गार्डन ६ फेब्रुवारीपासून खुले करण्यात येणार आहे.

mughal gaaradana
दिल्लीतील मुगल गार्डन

दिल्लीतील मुगल गार्डनचं उद्घाटन आज, सोमवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते होणार आहे. मात्र नागरीकांसाठी हे गार्डन ६ फेब्रुवारीपासून खुले करण्यात येणार आहे. या गार्डनमध्ये तब्बल १३८ प्रजातींच्या गुलाबाची झाडं पाहायला मिळणार असून १६० प्रकारची रोपं आणि ३०० हून अधिक बोनसाई रोपांचाही समावेष असणार आहे. बुधवारपासून सर्वसामान्यांसाठी खुलं होणाऱ्या या गार्डनमध्ये सकाळी ९ ते सायंकाळी ४ या दरम्यान जाता येणार आहे. प्रवेशद्वार क्र. ३५ नॉर्थ एव्हेन्यूच्या दिशेने गार्डनमध्ये प्रवेश करता येणार आहे. यंदा प्रथमच राष्ट्रपती भवन प्रशासनाच्या वतीने प्रवेशासाठी ऑनलाईन बुकींगची सुरुवात केली आहे. हे गार्डन सोमवारी बंद ठेवण्यात येणार आहे.

विनामुल्य प्रवेश 

या गार्डनमध्ये मंगळवार ते शुक्रवार ९ ते ४ वाजेपर्यंत आणि शनिवार – रविवार तीन-तीन तासांच्या वेळेत म्हणजेच ९, १० आणि ११ वाजता फेरफटका मारता येणार आहे. शुक्रवारपर्यंतच्या एका ऑनलाईन बुकींगमध्ये ५ व्हिजिटर्स गार्डनमध्ये प्रवेश घेऊ शकतात. दिलेल्या वेळेत पोहचू शकला नाहीत तर सामान्य व्हिजिटर्ससारखे रांगेत उभं राहून गार्डनमध्ये प्रवेश घ्यावा लागेल. या गार्डनमध्ये प्रवेशासाठी कोणतही शुल्क आकारणं जाणार नाही.

या सुविधा

  • पिण्याचे पाणी
  • स्वच्छतागृह
  • वैद्यकीय सेवा
  • ज्येष्ठ नागरीक, महिला, बालकांसाठी विश्रामगृह

या वस्तू घेऊन जाता येतील

  • पाण्याची बाटली
  • ब्रीफकेस, हँडबॅग, लेडीज पर्स
  • कॅमेरा, रेडिओ किंवा ट्रांजिस्टर
  • डब्बा, छत्री किंवा खाद्यपदार्थ