Friday, May 7, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी The Australian ने मोदींबाबत लिहिलेल्या बातमीवर भारतीय कमिशन ने केला खुलासा

The Australian ने मोदींबाबत लिहिलेल्या बातमीवर भारतीय कमिशन ने केला खुलासा

कोरोना साथीच्या आजाराविरुद्ध मानवतेचा समान लढा कमकुवत करण्याचा हा प्रकार आहे

Related Story

- Advertisement -

देशात कोरोना प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांमुळे जगभरात भारताची चर्चा होत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशातील परिस्थिती चिंताजनक झाली आहे. ऑस्ट्रेलियन वृत्तपत्रात फिलिप शेरवेल यांनी एक लेख प्रकाशित केला होता. रविवार २५ एप्रिल २०२१ रोजी लेख प्रकाशित केला होता. यावर The Australian ने मोदींबाबत लिहिलेल्या बातमीवर भारतीय कमिशन ने केला खुलासा केला आहे.

भारतील कमिशनने म्हटले आहे की, वृत्तपत्रात प्रकाशित करण्यात आलेल्या लेख पाहून आश्चर्यचकित झाले. कोणत्याही प्रकरणाची सत्यतेची तपासणी न करता किंवा भारत सरकारमधील कोणत्याही विभागाकडून माहिती न घेता लेख लिहिण्यात आला आहे. भारत सरकारने जागतिक महामारीमध्ये दिलेल्या लढ्यावर टीका करण्यात आला आहे. तसेच हा लेख निंदनीय असल्याचे भारत कमिशनने म्हटले आहे.

- Advertisement -

भारताने कोरोना विरुद्ध सुरु असलेल्या लढ्यात जगातील सर्वात मोठा लॉकडाऊन केला होता. सर्वात मोठी लसीकरण मोहिम आणि जलद गतीने १४० मिलीयन लोकांना लसीकरण केले आहे. भारत सरकारने कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या आहेत. सर्वात जास्त कोरोना चाचण्या म्हणजेच १.७ दशलक्ष चाचण्या एका दिवसात करण्यात आल्या आहेत. आरोग्य सुविधा पुरवत आतापर्यंत अनेक लोकांचे प्राण वाचवले आहे. कोरोना लस मैत्री अंतर्गत ६६ दशलक्ष लसींचा जगातील ८० देशांना पुरवठा करण्यात आला आहे. तसेच १५० देशांना पीपीई किट पुरवण्यात आले आहेत.

- Advertisement -

भारतात पुन्हा कोरोना संसर्ग पसरला आहे. या संसर्गाविरोधात लढा देण्यासाठी सर्वोत्तोपरी उपाययोजना केल्या जात आहेत. भारतीय अधिकाऱ्यांनी देशातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला आहे. तसेच आम्हाला विश्वास आहे की, लवकरात लवकर या कोरोना लढ्यात यश मिळेल. भारतातील प्रत्येक नागरिकाचे कल्याण ही भारत सरकारची प्राथमिकता आहे. तसेच आमचे वैद्यानिक कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रयत्न करत आहेत. बाहेरून देशात आलेल्या नव्या कोरोनाच्या स्ट्रेनमुळे हा हाहाकार माजला आहे. पंतप्रधान यांनी निवडणूक आणि धार्मिक कार्यक्रमांना परवानगी दिल्यामुळे या लेखात मोदींबाबत लिहिण्यात आले आहे.

आपण प्रकाशित केलेल्या द्वेषयुक्त लेखात घृणा आणि खोटी माहिती प्रसारित करण्यात आली आहे. कोरोना साथीच्या आजाराविरुद्ध मानवतेचा समान लढा कमकुवत करण्याचा हा प्रकार आहे. हे प्रकाशनाच्या प्रतिष्ठेसाठी चांगले नसल्याचे भारत कमिशनने म्हटले आहे. मी आशा करतो की आपण याबाबत पुन्हा अचूक लेख प्रकाशित कराल तसेच भविष्यात अशाप्रकारचे लेख प्रकाशित करणार नाही अशी आशा करत असल्याचे भारतीय कमिशनने म्हटले आहे.

- Advertisement -