Eco friendly bappa Competition
घर देश-विदेश खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येचा मुद्दा तापला; कॅनडाने केले भारतावर गंभीर आरोप

खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येचा मुद्दा तापला; कॅनडाने केले भारतावर गंभीर आरोप

Subscribe

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन टुडो यांनी भारतावर मोठा आरोप केला आहे. ते म्हणाले की, हरदीपसिंह निज्जर यांच्या हत्येमागे भारत सरकारचा हात असू शकतो. याला प्रत्युत्तर म्हणून आता भारत सरकारने कॅनडाला फटकारणारे निवेदन जारी केले आहे.

नवी दिल्ली : भारत आणि कॅनडामधील आंतरराष्ट्रीय संबंध खराब होण्याचे चिन्ह आहेत. कारण, कॅनडाने थेट भारतावर खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येचा संशय व्यक्त केला आहे. कॅनडाचा या आरोपाना भारताने मंगळवारी फेटाळून लावले जरी असले तरी आंतरराष्ट्रीय पातळीवर मात्र हा मुद्दा तापत असल्याचे दिसून येत आहे. (The issue of the killing of Khalistani terrorist Hardeep Singh Nijjar became hot Canada made serious accusations against India)

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन टुडो यांनी भारतावर मोठा आरोप केला आहे. ते म्हणाले की, हरदीपसिंह निज्जर यांच्या हत्येमागे भारत सरकारचा हात असू शकतो. याला प्रत्युत्तर म्हणून आता भारत सरकारने कॅनडाला फटकारणारे निवेदन जारी केले आहे.

यापूर्वीही केले होते कॅनडाने भारतावर आरोप

- Advertisement -

भारत सरकारने यापूर्वीही निज्जरच्या हत्येतील आपली भूमिका नाकारली आहे. निज्जरची हत्या भारतीय एजंटांनी केल्याचे यापूर्वी कॅनडाकडून आरोप करण्यात आले होते. मात्र भारताने हे आरोप फेटाळून लावले आहेत. निज्जरच्या हत्येतील भारताच्या भूमिकेचा तपास पाहता कॅनडानेही आपल्या सर्वोच्च भारतीय राजनयिकाची हकालपट्टी केली आहे. या घटनेनंतर भारत आणि कॅनडामधील संबंध आणखी बिघडणार असल्याचे मानले जात आहे.

हेही वाचा : …हे राज्यावरील एक गंभीर संकटच, ठाकरे गटाची शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा

उच्चपदस्थ अधिकाऱ्याची केली हकालपट्टी

- Advertisement -

कॅनडाच्या या आरोपानंतर भारत सरकारने कठोर पाऊले उचलण्यास सुरूवात केली आहे. त्यांनी आधी नवी दिल्लीत उपस्थित असलेल्या कॅनडाचे उच्चायुक्त कॅमेरून मॅके यांना समन्स पाठवला. तर साऊथ ब्लॉकमध्ये बोलावून भारतावर होत असलेल्या आरोपांवर नाराजी व्यक्त केली. त्यानंतर कॅनडाच्या एका उच्चपदस्थ राजनैतिकाला नवी दिल्लीतून निघून जाण्याचे आदेशही दिले.

हेही वाचा : अमृता फडणवीसांना ब्लॅकमेल करणाऱ्या अनिल जयसिंघानीला जामीन मंजूर; विशेष सत्र न्यायालयाचा मोठा निर्णय

काय दिले भारताने कॅनडाला प्रत्युत्तर

भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने मंगळवारी सकाळी एक निवेदन जारी करून सांगितले की, कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी संसदेत दिलेल्या विधानाची छाननी करण्यात आली आहे. त्यांच्या परराष्ट्रमंत्र्यांचे वक्तव्यही ऐकायला मिळाले आहे. कॅनडाचे पंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्र्यांचे आरोप आम्हाला मान्य नसून, कॅनडामध्ये होणाऱ्या कोणत्याही हिंसाचारात भारत सरकारचा सहभाग असल्याचा आरोप करणे अत्यंत मूर्खपणाचे आणि राजकीयदृष्ट्या प्रेरित आहे.

काय लावले होते कॅनडाने भारतावर आरोप?

कॅनडातील खलिस्तानी दहशतवाद्याच्या हत्येचा भारत सरकारशी संबंध असू शकतो, असा आरोप कॅनडाचे पंतप्रधान ट्रुडो यांनी केला आहे. कॅनडाच्या संसदेला संबोधित करताना ट्रूडो म्हणाले की, शीख नेते हरदीप सिंग निज्जर यांच्या हत्येनंतर कॅनडाच्या गुप्तचर यंत्रणांनी आरोपांची चौकशी सुरू केली आहे. आपल्या देशाच्या भूमीवर कॅनडाच्या नागरिकाच्या हत्येमागे परकीय सरकारचा हात असणं अजिबात मान्य नाही, असं ते म्हणाले. हे आमच्या सार्वभौमत्वाचे उल्लंघन आहे. जूनमध्ये ब्रिटिश कोलंबियातील गुरुद्वाराबाहेर निज्जर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.

- Advertisment -